सिंधुदुर्ग today
सन्मित्र रिक्षा संघटना नांदगाव तर्फे २२ फेब्रुवारी रोजी श्री सत्यनारायण महापूजा निमित्त विविध कार्यक्रम
ट्रिकसीन नाट्यप्रयोग व्यंकटेश पद्मावती
सायं.४ वा. डबलबारी भजनांचा जंगी सामना
नांदगाव ऋषिकेश मोरजकर
कणकवली तालुक्यातील सन्मित्र रिक्षा संघटना नांदगाव च्या वतीने गुरुवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२४ रोजी श्री सत्यनारायण महापूजा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम पुढीलप्रमाणे सकाळी ९ वा.श्री सत्यनारायण महापूजा, सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत मोफत नेत्र तपासणी शिबिर, सकाळी ११ पासून आरती, तीर्थप्रसाद, दुपारी १ ते २ महाप्रसाद, दुपारी २ वाजता.स्थानिक भजन बुवा श्री ओमकार मेस्त्री, दुपारी ३ ते ६ महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी ४ ते १० पर्यंत डबलबारी भजनांचा जंगी सामना बुवा श्री अखिलेश फाळके, विरुद्ध बुवा श्री संदीप पुजारे , रात्री ठीक १० वाजता.कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुर सिध्देश कलिंगण यांचा ट्रिकसीनयुक्त व्यंकटेश पद्मावती हा सादर होणार आहे.अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सन्मित्र रिक्षा संघटना नांदगाव च्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा