सिंधुदुर्ग today
असलदे येथील तीन मंदिरात चोरी...
फंडपेटी फोडत अज्ञात चोरट्याने रोख रक्कम पळवली; चोरट्याने सीसीटीव्ही च्या समोर उलट चालत चकवा देण्याचा केला प्रयत्न.
कणकवली दि. ९ फेब्रुवारी(ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुक्यातील असलदे गावातील तीन मंदिरांमध्ये अज्ञात चोरट्याने फंडपेटी फोडत चोरी केली आहे.ही शुक्रवारी घटना मध्यरात्री घडली आहे.चोरट्याने सीसीटीव्ही च्या समोर उलट चालत चकवा देण्याचा प्रयत्न केला आहे.सुमारे १० ते १५ हजार रुपये चोरीला गेले आहेत.
यामध्ये असलदे उगवतीवाडी येथील गणेश मंदिर फंड पेटी, माऊली देवी मंदिर फंड पेटी व डामरेवाडी येथील साईबाबा मंदिरातील फंड पेटी अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे. तिन्ही ठिकाणच्या फंड पेटी फोडून चोरट्याने आत असलेली रोकड लांबवली आहे. घटनास्थळी पोलिस हवालदार चंद्रकांत झोरे दाखल झाले आहेत.ग्रामपंचायत येथून सीसीटिव्ही फुटेज तापासणी केली जात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा