सिंधुदुर्ग today
ईच्छापूर्ती गणेश मंदिर बावशी येथे माघी गणेश जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम
पारंपारीक डबलबारी भजनाचा जंगी सामना बुवा प्रमोद हर्यान विरुध्द बुवा प्रकाश पारकर
कणकवली प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील बावशी गावठण येथील ईच्छापूर्ती गणेश मंदिर बावशी पावणादेवी सांस्कृतीक कला क्रिडा मंडळाच्या वतीने माघी गणेश जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
गणेश जयंती व प्रथम वर्धापण दिनानिमित्त सोमवार दि १२/०२/२०२४ ते बुधवार दि ते १४/०२/२०२४ या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. .
१२/०२/२०२४ सकाळी ९ वा गणेश मुर्तीचे पुजन ,दुपारी १२.३० वा आरती,सायं ५ वा लहान मुलांचे सांस्कृतीक कार्यक्रम, रात्रौ ८ वा आरती ,रात्रौ ९ वा महाप्रसाद, रात्रौ १० वा सुस्वर भजने,१३/०२/२०२४ सकाळी ९ वाजता अभिषेक व पुजन सकाळी १०.३० वाजता होमवहन, दुपारी १२वा जन्म उत्सव व महाआरती, दुपारी १ ते ३ महाप्रसाद , दुपारी ३ वा हळदीकुंकू समारंभ, सायं ४ वा नवस बोलणे व फेडणे,
सायं ५ वा पालखी प्रदक्षिणा व दिंडी, सायं ७ वा दिंडी भजन
रात्रौ ८वा महाआरती, रात्रौ ८.३० महाप्रसाद, रात्रौ ९.३० पारंपारीक डबलबारी भजनाचा जंगी सामना. बुवा श्री प्रमोद हर्यान गुरुवर्य- श्री रामदास कासले पावणादेवी प्रा भजन मंडळ. मुंबई विरुध्द बुवा श्री प्रकाश पारकर गुरुवर्य- कै चंद्रकांत कदम श्री दत्तगुरु प्रासादिक भजन मंडळ कासार्डे पारकर वाडी ता. कणकवली यांच्यात होणार आहे तर १४/०२/२०२४ पहाटे ५ वा काकड आरती, सकाळी ११ वा अभिषेक व पुजन
दुपारी १२ते २ समराधना महाप्रसाद अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तरी भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा