सिंधुदुर्ग today



नांदगाव तिठा येथे १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा.

नांदगाव किल्ला ते नांदगाव तिठा निघणार महाराजांच्या मूर्तीची मिरवणूक.

मावळे आम्ही स्वराज्याचे महाराष्ट्र सिंधुदुर्ग विभाग यांच्या वतीने आयोजन 

कणकवली प्रतिनिधी 

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा १९ फेब्रुवारी २०२४ रोजी होत आहे . हा सोहळा ३६५ दिवस गडकील्यांसाठी झगडणारा गडसंवर्धन करणारा महाराष्ट्र राज्यात उकृष्ट गडकिल्ले संवर्धन या कार्यासाठी २ वेळा पुरस्कार मिळून सन्मानित झालेला मावळे आम्ही स्वराज्याचे महाराष्ट्र राज्य { रजि.} सिंधुदुर्ग विभाग यांनी आयोजन केलं आहे. यानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गेले ४ वर्ष हा  शिवजन्मोत्सव तोंडवली या गावात करत होतो,तरी या वर्षीपासून आपल्या नांदगाव तिठा येथे आयोजित करण्याचे ठरविले आहे . 

नांदगाव किल्ला ते नांदगाव तिठा मिरवणूकीने  महाराजांच्या मूर्तीची होणार स्थापना. 

नांदगाव किल्ला या ठिकाणी  शिवाजी महाराज्यांच्या मूर्तीचे पूजन करून तिथून मूर्ती वाजत गाजत नांदगाव तिठा येथे मिरवणुकीने आणण्यात येणार आहे.सकाळी 9.30 वा.मिरवणूकीला सुरुवात होणार आहे.

तरी आपण सर्वांनी त्याच उत्साहाने,आनंदाने सामील व्हावे असे आवाहन मावळे आम्ही स्वराज्याचे महाराष्ट्र सिंधुदुर्ग विभाग  यांच्या वतीने करण्यात आले आहे .     

     

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today