सिंधुदुर्ग today



राष्ट्रीय अपंग विकास महासंघ-महाराष्ट्र शाखा सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष पदी सुनील तांबे यांची निवड

कणकवली प्रतिनिधी

राष्ट्रीय अपंग विकास महासंघ-महाराष्ट्र शाखा सिंधुदूर्ग तर्फे सिंधुदूर्ग जिल्हा अध्यक्ष म्हणून कणकवली तालुक्यातील असलदे येथील श्री. सुनील गणपत तांबे  यांची नेमणूक करण्यात आली आहे.
       राष्ट्रीय अपंग विकास महासंघ-महाराष्ट्र यांची राज्य स्तरीय सभा नुकतीच भाईंदर-मुंबई येथे पार पडली.
राष्ट्रीय अपंग विकास महासंघ महाराष्ट्र राज्य अध्यक्षा सौ. मेघाताई काळे, राज्य कार्य अध्यक्ष श्री.सुरेंद्र खरात, राज्य सचिव बाळासाहेब पाटील सर, राष्ट्रीय संपर्क प्रमुख मा. सुहास काळे यांच्या हस्ते  सुनील तांबे यांना सिंधुदूर्ग जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती देण्यात आली. कार्यक्रमास सर्व राष्ट्रीय कार्यकारीणी, सर्व जिल्हा प्रमुख, सर्व जिल्हा संचालक, राज्यतील सर्व अपंग बांधव , अपंग मित्र उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today