सिंधुदुर्ग today


कणकवली विधानसभा क्षेत्रातून अयोध्या येथे जाण्यासाठी नांदगाव तिठा येथे एकत्र येत आराम बस रवाना. 

नांदगाव ते पनवेल तर पनवेल हुन अयोध्या रेल्वे ने होणार प्रवास 

जय श्रीराम च्या घोषणांनी नांदगाव परिसर सोडला दणाणून .

नांदगाव ऋषिकेश मोरजकर 

कणकवली विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील अयोध्या येथे जाण्यासाठी आज सकाळी नांदगाव तिठा येथे देवगड, कणकवली, वैभववाडी एकत्र येत आराम बस पनवेल पर्यंत रवाना झाल्या आहेत . तर तेथून रेल्वेने प्रवास होणार आहे. भारतीय जनता पार्टी च्या वतीने याचे नियोजन केले आहे.

     याचे आमदार नितेश राणेंनी श्रीफळ वाढवून प्रवासाला सुरुवात केली आहे. व सर्वांचा प्रवास सुखकर होण्यासाठी शुभेच्छा ही दिल्या . जय श्री राम च्या घोषणांनी नांदगाव परिसर दणाणून गेला होता.

            प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून श्री राम भक्तांसाठी मोफत अयोध्या दर्शन व्यवस्था भारतीय जनता पार्टी च्या वतीने करण्यात आली आहे याचाच भाग म्हणून कणकवली विधानसभा मतदारसंघातून आज सकाळी ९ वा. नांदगाव तिठा येथे एकत्र येत अयोध्या श्री राम भक्त रवाना झाले आहेत. 

     यावेळी मनोज रावराणे, मिलिंद मेस्त्री, भाजपचे तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर,नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, महीला तालुका अध्यक्षा सौ.हर्षदा वाळके, माजी सभापती दिलीप तळेकर , हनुमंत वाळके, ग्रामपंचायत सदस्या जैबा नावलेकर, रज्जाक बटवाले, अब्बास बटवाले, कमलेश पाटील आदी उपस्थित होते.

     फटाक्यांची आतषबाजी करत जय श्री राम,प्रभु रामचंद्र की जय,जय भवानी जय शिवाजी आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today