सिंधुदुर्ग today



चर्मकार प्रवर्गातील २५,००० हजार युवक - युवतींना आणि महिलांना स्वयंरोजगारांची संधी.

लिडकॉम मुंबई आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र मार्फत सुवर्ण संधी 

सिंधुदुर्ग (ऋषिकेश मोरजकर) 

लिडकॉम मुंबई आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या चर्मकार प्रवर्गातील युवक युवतींना आणि महिलांना दर्जेदार उद्योजकता विकास आणि स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यासाठी 

सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. या करारामुळे तीन वर्षात 25 हजार चर्मकारांना प्रशिक्षण मिळणार आहे.

   या करारावर लिडकॉम  व्यवस्थापकीय संचालक श्री धम्मज्योती गजभिये,महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे केंद्रप्रमुख तथा राज्य समन्वयक श्री हेमंत वाघमारे यांनी स्वाक्षरी केली आहे.

     या प्रशिक्षणात चर्मकार उद्योगातील व्यवसाय योजना, वित्त व्यवस्थापन ,उत्पादन प्रक्रिया, विपणन आणि ग्राहक सेवा या सह विविध विषयांचा समावेश असेल . प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षकांना महामंडळाच्या योजना आणि इतर सरकारी योजनांचा लाभ घेता येईल. 

      या करारामुळे चर्मकार प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना आणि महिलांना उद्योजक बनण्याची संधी मिळेल. 

       चर्मकार प्रवर्गातील युवक युवतींना आणि महिलांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक सहभाग घ्यावा असे आवाहन श्री गजभिये यांनी केली आहे. 

        या कार्यक्रमाच्या वेळी लिडकॉम व्यवस्थापक श्रीमती स्नेहलता नरवाने, सह व्यवस्थापक श्री एन एम पवार, कंपनी सेक्रेटरी श्री प्रदीप रथ आणि प्रशासकीय अधिकारी सौ. संगीता पराते ,एम.सी. इ. डी . मार्फत राज्य समन्वयक श्री हेमंत वाघमारे व श्री युवराज इंगोले उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today