सिंधुदुर्ग today
नांदगाव येथील हायवे हद्द निश्चित करण्यासाठी मोजणी सर्वांना नोटीसा न बजावल्याने रोखली.
नांदगाव सरपंच भाई मोरजकर व माजी जि. प. सदस्य नागेश मोरये आक्रमक
नांदगाव ऋषिकेश मोरजकर
मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली तालुक्यातील नांदगाव हद्दीतील आर ओ डब्ल्यू मागणीनुसार आज काही हद्द मोजणी करिता हायवे प्राधिकरण व भुमी अभिलेख प्रतिनिधी आले असता संपूर्ण मोजणी ला शेतकऱ्यांना नोटीसा बजावल्या नसल्याने या मोजणी ला तीव्र विरोध करत मोजणी सुरू करण्या अगोदरच उपस्थित नांदगाव सरपंच भाई मोरजकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये यांनी मोजणी केलात तर सर्वांना नोटीसा का बजावली नाही. यामुळे अर्धवट मोजणी आम्हाला मान्य नाही अशी भूमिका घेत मोजणी करु नये अशी भूमिका घेतल्याने अखेर अधिकारी यांना मोजणी न करताच माघारी परतावे लागले आहे.
याबाबत नांदगाव सरपंच भाई मोरजकर बोलताना म्हणाले की, नांदगाव ग्रामपंचायत च्या माध्यमातून हायवे प्राधिकरण च्या प्रश्नांबाबत 9/ 11/ 2023 रोजी नांदगाव तिठा ब्रिज खाली आमरण उपोषण करण्यात आलं होतं त्यामध्ये विविध मागण्यांचा समावेश होता. त्यापैकीच एक नांदगाव पावाचीवाडी ते नांदगाव तिठा हायवेच्या दुतर्फा आर ओ डब्ल्यू लाईन निश्चित करून मिळावी अशी ग्रामस्थांची एक मागणी होती जेणेकरून हायवे लगत असलेल्या शेतकऱ्यांची जमीन संपादनात किती गेली व आता शिल्लक किती आहे त्याचा शोध घ्यावा अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात आली होती. नांदगाव तिठा येथे हायवे प्राधिकरण ची जागा रस्ता सोडून शिल्लक असल्याचे सांगण्यात आले होते आणि ती जागा परत हायवे प्राधिकरण ने ताब्यात घेतली तर तेथे आपल्याला बाजाराची व्यवस्था करता येईल असा त्यामागे उद्देश होता त्यासाठी उपोषण करण्यात आलं होतं आणि त्यादरम्यान मोजणी करून जागा ताब्यात देण्याचे आश्वासन प्राधिकरणाने दिले होते. आणि त्याच अनुषंगाने आज 5 फेब्रुवारी 2024 आणि 6 फेब्रुवारी 2024 रोजी दोन दिवस मोजणी होणार होती . परंतु त्यामध्ये अपेक्षित सर्वे नंबर, गट नंबर यांचा समावेश नव्हता हायवे प्राधिकरण कडून असा भोंगळ कारभार करण्यात आला की जाणीवपूर्वक ग्रामस्थांची तसेच ग्रामपंचायतची दिशाभूल केली आहे का?असेच म्हणावे लागेल.कारण त्यामध्ये अपेक्षित असलेल्या एकही गटाचा उल्लेख नव्हता त्यामुळे आज रोजी होणारी मोजणी करू न देता भूमि अभिलेखचे अधिकारी आणि हायवे प्राधिकरण चे अधिकारी यांना रोष व्यक्त करून माघारी पाठवण्यात आलं आणि जोपर्यंत ठोस लेखी आश्वासन मिळत नाही व यावर तोडगा काढला जात नाही तोपर्यंत मोजणी करू देणार नाही असे सांगण्यात आले.तर येत्या आठ-दहा दिवसात सार्वजनिक बांधकाम विभाग खारेपाटण यांच्याकडून कोणताही ठोस निर्णय झाला नाही तर खारेपाटण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा नांदगाव सरपंच रविराज ऊर्फ भाई मोरजकर यांनी हायवे प्राधिकरणाला दिला आहे .
यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये,चंदू खोत तसेच हायवे प्राधिकरण उप अभियंता श्री कुमावत व भुमी अभिलेख प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा