पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंधुदुर्ग today

इमेज
  अप्रस्थापित लोकांमुळेच भाषा जिवंत - कवी अजय कांडर. मराठी भाषा दिनी कणकवली कॉलेजमध्ये 'मराठी भाषा आणि आपण' विषयावर व्याख्यान.   कणकवली/प्रतिनिधी       प्रस्थापित लोकांचे जगणे जसे चकचकीत होत जाते तसे आपली भाषाही ते तोलून मापून बोलतात.त्यामुळे प्रस्थापित लोकांपेक्षा अप्रस्थापित लोकच भाषा जिवंत ठेवतात. कष्टकरी,कामगार,गांव गुंड असे लोकही नव्या शब्दांची निर्मिती करत असतात. जो पर्यंत खेड्यापाड्यातील अगळ पगळ बोलणारा वर्ग जास्त आहे तो पर्यंत भाषा जिवंतच राहणार आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी तथा स्तंभ लेखक अजय कांडर यांनी कणकवली महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा दिन व्याख्यानात केले.      मराठी भाषा दिनानिमित्त कणकवली कॉलेजच्या मराठी विभाग व अंतर्गत गुणवत्ता - हमी कक्ष विभागातर्फे  कवी कांडर यांचे 'मराठी भाषा आणि आपण' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी बोलताना कांडर यांनी इतिहासकार राजवाडे यांनी शंभर वर्षांपूर्वी मराठी भाषेला धोका असल्याचे सांगितले. तरीही भाषा अजून जिवंत आहे. पण बोली संपली तर आपली प्रमाण मराठी भाषा संपवू ...

सिंधुदुर्ग today

इमेज
जि.प.शाळा ओटव नं.१ येथे मराठी राजभाषा गौरव दिन संपन्न  कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले  : राजेश कदम  ---------------------------------------- कणकवली (ऋषिकेश मोरजकर) प्रतिनिधी: मराठी साहित्यातील ज्येष्ठ कवी, लेखक, नाटककार वि.वा.शिरवाडकर तथा कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा  २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस संपूर्ण राज्यभरात मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो.  या दिनाचे औचित्य साधून जि.प.शाळा ओटव नं.१ येथेही हा दिवस उत्साहात संपन्न झाला.  प्रशालेचे मुख्याध्यापक राजेश कदम यांनी सर्व विद्यार्थ्यांना कुसुमाग्रज यांच्या सामाजिक आशयाबरोबरच बालसुलभ मनांना हाक देणाऱ्या बालकवितांची ओळख करुन दिली. एका कवीचा जन्मदिवस मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो यातच कुसुमाग्रज यांचे अलौकिक साहित्यिक योगदान सामावले आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी त्यांनी मोलाचे सहकार्य केले आणि आपल्या साहित्यातून सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात मराठी भाषेला मोठ्या उंचीवर पोहोचवले असे प्रतिपादन राजेश कदम यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना केले....

सिंधुदुर्ग today

इमेज
कणकवली शहरातील दुकानांतील  अमराठी फलका संदर्भात  मनसेने वेधले नगरपालिका मुख्याधिकारी यांचे लक्ष. शासन निर्णयाप्रमाणे अमंलबजावणी करण्याची मागणी.  कणकवली प्रतिनिधी                 मराठी राजभाषा दिनानिमित्त कणकवली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने कणकवली शहराध्यक्ष श्री.योगेश कदम यांचे नेतृत्वाखाली कणकवली नगरपंचायत च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील मॅडम यांची भेट घेऊन कणकवली शहरातील काही दुकाने व आस्थापना यांचे फलक नगरपंचायत प्रशासनाने नोटीस देऊनही व शासन निर्णय असून ही फलक बदल केलेले नाहीत त्याबद्दल निवेदन व चर्चा करून लक्ष वेधले तसेच कणकवली शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील मॅडम यांना सांगितले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कणकवली तालुका सचिव श्री.संतोष कुडाळकर,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री.अनिकेत तर्फे,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कणकवली शहराध्यक्ष श्री.योगेश कदम व मनसैनिक श्री.श्रीकांत सादये  हे उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
गुणवत्तापूर्ण कामातून जिल्ह्याच्या सर्वांगीण  वि कासाला प्राधान्य. - पालकमंत्री नितेश राणे 300 कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी. प्रत्येक वर्षी डिसेंबर अखेर सर्व कामे पुर्ण करणार. आर्थिक शिस्तीला प्राधान्य.         सिंधुदुर्गनगरी  दिनांक 26  (ऋषिकेश मोरजकर) :               जिल्हा वार्षिक योजनेसोबतच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधून जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळविण्याचा पालकमंत्री म्हणून माझा प्रयत्न राहणार आहे. पुढील आर्थिक वर्षामध्ये ३०० कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. या निधीतून गुणवत्तापूर्ण कामातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य राहणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले. देवगड येथील शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. या उद्घाटनानंतर झालेल्या पत्रकार परीषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी माजी आमदार श्री गोगटे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आदी उपस्थित होते.           पालकमंत्री म्हणाले, मुख...

सिंधुदुर्ग today

इमेज
निखिल कॉन्ट्रॅक्शन ग्रूप प्रा. ली. पुणे, यांच्या CSR फंड मधून शाळांना संगणक वाटप. तोंडवली बावशी शाळांना संगणक वाटप. ना.नितेश राणेंच्या प्रयत्नातून मिळाले संगणक  कणकवली (ऋषिकेश मोरजकर)  पालकमंत्री सिंधुदुर्ग तथा मत्स्य बंदर विकास मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नातून व निखिल कॉन्ट्रॅक्शन ग्रूप प्रा. ली. पुणे. यांचे CSR फंड मधून मौजे तोंडवली व बावशी येथील शाळांना संगणक वाटप करण्यात आले.      यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, तोंडवली बावशी सरपंच मनाली गुरव, उपसरपंच दिनेश कांडर, माजी उपसरपंच अशोक बोभाटे, कंपनीचे अँड स्वप्नील जगताप, प्रशांत कांबळे, अँड व्यंकटेश वाडेकर, प्रसाद शेळके, तोंडवली पोलीस पाटील विजय मोरये, केंद्र प्रमुख नारायण ओटवकर, मुख्याध्यापक तोंडवली नं. १ संदीप जाधव, मुख्याध्यापक तोंडवली बोभाटेवाडी मैथिली पवार, मुख्याध्यापक तोंडवली गावठण महेश चव्हाण, मुख्याध्यापक बावशी शेळीची वाडी उत्तम सातवसे, मुख्याध्यापक बावशी नंबर १ विनोद ठाकूर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रल्हाद कुडतरकर, सुप्रिया बोभाटे , कौस्तुभ...

सिंधुदुर्ग today

इमेज
उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर. सिंधुदुर्गनगरी दिनांक 25 (ऋषिकेश मोरजकर) :-   उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवार दि. 26 फेब्रुवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.          बुधवार दि. 26 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता चिपी विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने डॉ. बोरफळकर सरिता हॉस्पिटल जवळील नंदकिशोर जोशी यांच्या जागेवरील हेलिपॅड ता. देवगडकडे प्रयाण,  सकाळी 10.45 वाजता डॉ. बोरफळकर सरिता हॉस्पिटल जवळील नंदकिशोर जोशी यांचे जागेवरील हेलिपॅड, ता. देवगड येथे आगमन व मोटारीने कुणकेश्वर मंदिर ता. देवगडकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता कुणकेश्वर मंदिर येथे दर्शन व राखीव. सकाळी 11.30 वाजता मोटारीने श्री. रविंद्र फाटक, माजी आमदार यांच्या निवासस्थानाकडे प्रयाण. सकाळी 11.45 वाजता श्री. रविंद्र फाटक, माजी आमदार यांच्या निवासस्थान येथे राखीव. दुपारी 12.15 वाजता मोटारीने डॉ. बोरफळकर सरिता हॉस्पिटल जवळील नंदकिशोर जोशी यांच्या जागेवरील हेलिपॅड ता. देवगडकडे प्रयाण. दुपारी 12...

सिंधुदुर्ग today

इमेज
बेकायदा एलईडी मासेमारी करताना बोटीवर कारवाई  मत्स्य विभागाने पहाटेच्या वेळी केली देवगड समुद्रात कारवाई बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या बोटीसह पाच कामगारांना घेतले ताब्यात  देवगड (प्रतिनिधी ) देवगड समुद्रात अनधिकृत रित्या एलईडी फिशिंग करताना  बोटीवर मत्स्य विभागाने कारवाई केली आहे. एलईडी चा प्रकाशात बेकादेशीरपणे  मासेमारी करणाऱ्या पाच कामगारांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई देवगड समुद्रकिनाऱ्यापासून १८ वाव समुद्रात करण्यात आली आहे. या कारवाईने पुन्हा एकदा मत्स्य विभाग सतर्क आणि कार्यक्षम असल्याचे दिसून आले.     विघ्नहर्ता नावाची बोट देवगड समुद्रात एलईडी फिशिंग करत असल्याचे मत्स्य विभागाच्या लक्षात आल्यानंतर पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. एलईडी मासेमारी करण्यास बंदी असताना सुद्धा अशा पद्धतीची मासेमारी चोरी चुपे केली जाते, याबद्दल अनेक वेळा विधिमंडळापासून मच्छीमारांपर्यंत तक्रारी करण्यात आलेल्या होत्या. या तक्रारीची दखल घेऊन शासनाने कारवाई अधिकच गतिमान केलेले आहे. आज पहाटे केलेल्या विघ्नहर्ता बोटीवरील कारवाईत  पाच कर्मचारी बेकायदेशीर रित्या मा...

सिंधुदुर्ग today

इमेज
  कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रा – भव्य दिव्य लेझर शोचे आयोजन ऋषिकेश मोरजकर | कुणकेश्वर  बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या सौजन्याने  यंदाच्या कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रेमध्ये भाविकांसाठी भव्य दिव्य लेझर शो आयोजित करण्यात आला आहे. शिवतांडव व बीम शो हे दोन प्रकार यात्रेच्या निमित्ताने भाविकांना अनुभवता येणार आहेत, अशी माहिती सिंधुदुर्ग भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी दिली आहे. लेझर शो हे यात्रेचे मुख्य आकर्षण असून, भाविकांना या शोच्या माध्यमातून शिवाचे भव्य दर्शन घडवण्याचा मानस नामदार नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे. हा अनोखा अनुभव मिळावा यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. या लेझर शोमुळे यात्रेत आलेले भाविक अधिक काळ थांबतील आणि हा अद्भुत अनुभव घेऊ शकतील, अशी अपेक्षा संदीप साटम यांनी व्यक्त केली आहे. महाशिवरात्री यात्रा भव्य दिव्य आणि सुरक्षित व्हावी यासाठी संपूर्ण प्रशासन नामदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. कुणकेश्वर ग्रामपंचायत व कुणकेश्वर ट्रस्टही या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावत ...

सिंधुदुर्ग today

इमेज
कणकवली येथील ऍड. विलास परब यांची भारत सरकारच्या वतीने नोटरी म्हणून नियुक्ती. सर्व स्तरातून होत आहे अभिनंदन.  कणकवली (ऋषिकेश मोरजकर) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली  येथील ऍड. विलास परब यांची भारत सरकारच्या माध्यमातून नोटरी म्हणून नियुक्ती केली आहे. ऍड विलास परब हे गेली 28 वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वकीली व्यवसाय करीत आहेत.      ऍड. विलास परब यांची भारत सरकारने नोटरी म्हणून नियुक्ती केल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
  प्रितगंध फाउंडेशन मुंबई यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य आदर्शवत -नागेश मोरये       कणकवली प्रतिनिधी         प्रितगंध फाउंडेशन मुंबईचे अध्यक्ष संतोष महाडेश्वर, खजिनदार शिवानी महाडेश्वर आणि त्यांचे सहकारी यांनी  फाउंडेशनच्या वतीने केंद्र शाळा नांदगाव नं.१ मधील पाच गरजू विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेच्या माध्यमातून प्रत्येकी ३०० रू आर्थिक सहाय्य केले.तसेच शाळेतील सर्व एकूण ५६ मुलांना कंपासपेटी व खाऊ वाटप केले. शिक्षण सहाय्यक मंडळ नांदगाव चे अध्यक्ष नागेश मोरये यांनी प्रितगंध फाउंडेशनच्या या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले व असेच सामाजिक व शैक्षणिक उपक्रम समाजासाठी राबवावेत यासाठी शुभेच्छा दिल्या.          यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष महाडेश्वर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,आपण समाजाचे काही ना काही देणे लागतो.यासाठी आम्ही अनेक सामाजिक उपक्रम राबवितो.शाळेतील गरजू मुलांना सहकार्य करताना आपल्याला  विशेष आनंद वाटतो.          शाळेचे मुख्याध्यापक सुहास सावंत यांनी फा...

सिंधुदुर्ग today

इमेज
राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत कवयित्री आर्या बागवे प्रथम अभिनेते अनिल गवस यांच्या उपस्थितीत गौरव कणकवली/प्रतिनिधी    एकता कल्चर मुंबईतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्यस्पर्धेत त्रिंबक येथील कवयित्री आर्या बागवे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.'सरोगेट मदर ' या कवितेसाठी या प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाने बागवे यांचा गौरव करण्यात आला आहे.        मुंबई गिरगाव साहित्य संघ येथे मुंबई एकता कल्चर अकादमीचा  वार्षिक पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेते अनिल गवस यांच्या प्रमुख उपस्थितीत कवी शिवाजी गावडे यांच्या हस्ते सदर पारितोषिकाने कवयित्री आर्या बागवे यांना गौरविण्यात आले. यावेळी एकता कल्चर अकादमीचे अध्यक्ष प्रकाश जाधव, स्त्रीवादी कार्यकर्त्या ज्योती म्हापसेकर,चित्रकार प्रदीप म्हापसेकर, नृत्य दिग्दर्शक सदानंद राणे आदी मान्यवर उपस्थित होते.     आर्या बागवे या गेली काही वर्ष सातत्याने निष्ठेने कविता लिहीत असून त्यांना यापूर्वी विविध काव्य स्पर्धेत पारितोषिकही प्राप्त झाली आहेत.त्यांच्या या यशाबद्दल सिंधुदुर्गच...

सिंधुदुर्ग today

इमेज
कोळोशी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ. पालकमंत्री नितेश राणे यांनी निधी उपलब्ध करून दिल्याने ग्रामस्थांनी मानले आभार नांदगाव प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील कोळोशी येथे आज शिवजन्मोत्सव निमित्ताने विविध विकास कामांचा शुभारंभ भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर यांच्या हस्ते करण्यात आला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याने ग्रामस्थांनी आभार मानले आहे.       या विकास कामांमध्ये कोळोशी ग्रामपंचायत कार्यालय नवीन इमारत बांधणे, मुख्य स्मशानभूमी सुशोभीकरण करणे, देवगड निपाणी रस्ता ते कुलस्वामिनी मंदिर खडीकरण व डांबरीकरण करणे या कामांचे शुभारंभ आज करण्यात आले आहे.        यावेळी कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर, उपसरपंच अतुल गुरव, भाजपचे तालुकाध्यक्ष सरचिटणीस पंढरी वायंगणकर, शक्ती केंद्र प्रमुख भाई मोरजकर, सुशील इंदप, सोसायटी चेअरमन संतोष चव्हाण, शैलेश इंदप,कोळोशी ग्रामपंचायत अधिकारी मंगेश राणे, निरज मोरये, रज्जाक बटवाले,वाघमारे, आप्पा इंदप, दादा कुलकर्णी,छोटु खोत,चंद्रकांत इंदप, बबन गुरव ,  लक्ष्मण मेस्त्री , प्रकाश पावसकर विजय राणे,...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथील आगीत भस्मसात झालेल्या मालमत्तेचे १९ लाख ७१ हजारांचे नुकसान  तर बाजूला असलेल्या किराणा माल व कोल्ड्रिंक्स चे ३,४० हजार नुकसान  ऋषिकेश मोरजकर/नांदगाव         कणकवली तालुक्यातील नांदगाव मोरये वाडी येथील  मनोहर आत्माराम बिडये व पुजा देवेंद्र बिडये यांच्या सामाईक बंद घराला काल रात्री ८:३० सुमारास अचानक आग लागली होती.या आगीत पुर्ण घर आणि दुकान जळून बेचिराख झाले होते.याचा आज नांदगाव मंडळ अधिकारी आत्मबोध जाधव व नांदगाव तलाठी सुदर्शन अलकुटे यांनी पंचनामा केला असता मनोहर आत्माराम बिडये व पुजा देवेंद्र बिडये यांचे पूर्ण राहते घर, घरातील साहित्य इलेक्ट्रॉनिक वस्तू, ७ तोळे सोने, असे एकूण १९, लाख ७१ हजार रुपयांचे नुकसान झाले तर बाजूला असलेल्या त्यांच्याच मालकीच्या गाळ्यात लवू राजाराम लाड हे किराणा दुकान, कोल्ड्रिंक्स, इतर साहित्य होते त्यांचे एकूण ३,४०, हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद झाली आहे.           या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज कणकवली तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांनी नांदगाव येथील जळीत ग्रस्त घराला भेट देत पाहणी केली. व...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव मोरयेवाडी येथील आगीत भस्मसात झालेल्या बिडये बंधूंच्या घराची तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांनी केली पाहणी  ऋषिकेश मोरजकर/नांदगाव         नांदगाव मोरये वाडी येथील  मनोहर आत्माराम बिडये व पुजा देवेंद्र बिडये यांच्या सामाईक बंद घराला काल रात्री ८:३० सुमारास अचानक आग लागली होती.या आगीत पुर्ण घर आणि दुकान जळून बेचिराख झाले होते . सुमारे एक तासानंतर दाखल झालेल्या अग्निशामक बंबालाही ही आग आटोक्यात येताना कठीण जात होते.         या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज कणकवली तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांनी नांदगाव येथील जळीत ग्रस्त घराला भेट देत पाहणी केली.       यावेळी त्यांच्या समवेत नांदगाव सरपंच भाई मोरजकर, डी.एम. पाटील ,मंडळ अधिकारी आत्मबोध जाधव, तलाठी सुदर्शन अलकुटे, ग्रामविकास अधिकारी आर.डी.सावंत, नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर, ग्रामपंचायत सदस्य विठोबा कांदळकर, शंकर मोरये, संतोष बिडये, आदी स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते    रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न      राहत्या घराला आग लागल्या...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव मोरयेवाडी येथील बिडये बंधूंचे घर आगीत भस्मसात  शॉर्ट सर्किट झाल्याचा प्राथमिक अंदाज; काही वेळातच झाला सिलेंडर चा ही स्पोट ऋषिकेश मोरजकर/नांदगाव         नांदगाव मोरये वाडी येथील  मनोहर आत्माराम बिडये व पुजा देवेंद्र बिडये यांच्या सामाईक बंद घराला रात्री ८:३० सुमारास अचानक आग लागली.या आगीत पुर्ण घर आणि दुकान जळून बेचिराख झाले.सुमारे एक तासानंतर दाखल झालेल्या अग्निशामक बंबालाही ही आग आटोक्यात येताना कठीण जात होते.       मुंबई गोवा महामार्गावर  बिडये कुटुंबियांच्या  घराला आग लागली. बिडये कुटूबिय मुंबई येथे वास्तव्यास असतात.  तर श्रीमती सुनंदा बिडये या आजी येथे असतात मात्र तब्येत बरी नसल्याने काही दिवसांपुर्वी या आजी मुंबई येथे गेल्या होत्या.तर याच घरात किराणा मालाचे लवू राजाराम लाड हे दुकान चालवितात मात्र हे दुकानही एक महिन्यापासून बंद आहे.सुमारे ८:३० च्या सुमारास आग लागल्याचे लोकांच्या निदर्शनास आले.यानंतर स्थानिकांकडून अग्निशामक दलाला कळविण्यात आले.मात्र एक तासाने बंब दाखल झाला.तोपर्यंत आगिने सं...

सिंधुदुर्ग today

इमेज
  लक्ष्मी विष्णू वाळके यांचे निधन. हनुमंत वाळके सर यांना मातृशोक  नांदगाव प्रतिनिधी  नांदगाव पावाचीवाडी येथील  लक्ष्मी विष्णू वाळके वय 90 वर्षे यांचे नुकतेच राहत्या घरी निधन झाले आहे.वारगाव हाय.चे मुख्याध्यापक हनुमंत वाळके सर यांच्या त्या मातोश्री होत. नांदगाव पंचायत समिती माजी सदस्या व भाजपा महिला तालुकाध्यक्ष सौ. हर्षदा वाळके यांच्या त्या सासू होत.       त्यांच्या पश्चात ४ विवाहित मुलगे , एक विवाहित मुलगी,सुना , नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. उद्या सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव तिठा येथे मावळे आम्ही स्वराज्याचे यांच्यावतीने १९ फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव होणार साजरा.  विविध कार्यक्रमांचे आयोजन कणकवली (ऋषिकेश मोरजकर) कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा येथे मावळे आम्ही स्वराज्याचे यांच्यावतीने १९ फेब्रुवारी शिवजयंती निमित्त  शिवजन्मोत्सव साजरा होणार आहे.         कार्यक्रम पुढीलप्रमाणे सकाळी ८ वा. अभिषेक, महाआरती, सकाळी ठीक १० वा. भगव्या ध्वजाचे पुजन , सकाळी ११ वा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवकार्य करत असलेल्या विविध संस्थांचे सत्कार , दुपारी २ वा. स्थानिक सुस्वर भजन, दुपारी ३ वा. महिलांसाठी हळदीकुंकू, सायंकाळी ४ वा. होम मिनिस्टर खेळ पैठणीचा, सायंकाळी ६ वा. पावणादेवी समई नृत्य किंजवडे , सायंकाळी ७ वा. जिल्हास्तरीय पारंपरिक नृत्य स्पर्धा अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व शिवभक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन अनिकेत तर्फे यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
सरकारचे सांस्कृतिक धोरण अस्थिर - संमेलनाध्यक्ष कवी अजय कांडर कोकणभूमी साहित्य कला संमेलनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद एम.व्ही.डी.कला अकादमीतर्फे साहित्य कला संमेलनालनाचे उत्तम आयोजन कणकवली/प्रतिनिधी    ओसरगांव येथे कोकण एम. व्ही. डी. कला अकादमी  सुरू करण्यात आली हा कोकणच्या कला सांस्कृतिक इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावावा असा क्षण आहे.सरकारचे सांस्कृतिक धोरण अस्थिर राहिल्यामुळे कोकणबरोबरच महाराष्ट्रातील स्थानिक कलाकार उपेक्षित राहिला. या सगळ्या पार्श्वभूमीवर कोकणच्या कलाक्षेत्रात कोकण कला अकादमी सुरू करणाऱ्या कॅप्टन विलास सावंत दांपत्याचे योगदान महत्त्वाचे ठरेल असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांनी कोकणभूमी साहित्य कला संमेलनाच्या अध्यक्षपदावर बोलताना केले.      कोकण एम. व्ही. डी. कला अकादमीतर्फे ओसरगांव येथे कवी अजय कांडर यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवशीय कोकण भूमी साहित्य कला संमेलन आयोजित करण्यात आले. ज्येष्ठ गायिका डॉ शकुंतला भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या संमेलनात बोलताना कांडर यांनी माणसांच्या पोटाला जशी भूक लागते तशी माणसाच्य...

सिंधुदुर्ग today

इमेज
बिडवाडी उपसरपंच सुदाम तेलींसह ग्रामपंचायत सदस्यांनी केला भाजपात प्रवेश  मंत्री नितेश राणे यांचा उबाठा सेनेला बिडवाडी विभागात जोरकस धक्का, सहा ग्रामपंचायत सदस्यांनी उबाठाला  सोडचिट्टी देत भाजपात प्रवेश  शेकडो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी भाजपात केला पक्षप्रवेश कणकवली प्रतिनिधी   मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यातील ठाकरे शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. बिडवाडी उपसरपंच सुदाम तेली यांनी मंत्री नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सहकारी ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थिती उबाठा सेनेच्या असंख्य कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसमवेतभाजपामध्ये प्रवेश केला आहे.    यावेळी त्याच्या समवेत ग्रा.प.सदस्य प्रकाश लाड , ग्रा.प सदस्य संदीप चव्हाण , ग्रा.प सदस्य श्याम कदम ,ग्रा.प सदस्य आर्या राणे , ग्रा.प सदस्य नंदा सावंत , ग्रा.प.सदस्य प्रतीक्षा तांबे आदींसह ठाकरे शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी यांनी  भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी हा पक्षप्रवे...

सिंधुदुर्ग today

इमेज
बेळणे खुर्द गावचे सरपंच अविनाश गिरकर यांचा उबाठा युवा पदाधिकाऱ्यांसमवेत भाजप मध्ये प्रवेश उबाठा सेनेचे उपशाखा प्रमुख, युवासेना उपविभागप्रमुख,युवा शाखा प्रमुख अशा युवकांच्या फौजा भाजपमध्ये दाखल. मंत्री नितेश राणे यांनी केले भाजपात स्वागत.. कणकवली प्रतिनिधी  बेळणे खुर्द गावचे सरपंच अविनाश गिरकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत भाजपात पक्षप्रवेश प्रवेश केला. पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे भारतीय जनता पार्टीत स्वागत केले.भाजपच्या शाली परिधान करून त्यांना पक्षप्रवेश दिला. मंत्री नितेश राणे यांच्या कामाची धडाडी आणि त्यांच्या विचारांवर प्रेरित होऊन आपण सर्व युवक भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे सरपंच अविनाश गिरकर यांनी सांगितले.  यावेळी उबाठा पक्षाचे उपशाखा प्रमुख  उदय चाळके,  उपविभागप्रमुख युवासेना गणेश गिरकर , युवासेना शाखाप्रमुख रोहन चाळके, दया चाळके , प्रसाद चाळके , अमोल लाड , विशाल लाड ,  अनिल चाळके, अनिश चाळके , संदेश चाळके , संदेश तांबे , निखिल तांबे , उदय मुंज , संजय पुजारे आदींसह ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्...

सिंधुदुर्ग today

इमेज
कोकणभूमी साहित्य कला संमेलन अध्यक्षपदी कवी अजय कांडर तर प्रमुख पाहुण्या गायिका डॉ. शकुंतला भरणे एम.व्ही.डी.कला अकादमीतर्फे ओसरगांव येथे १५ फेब्रुवारी रोजी आयोजन जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा शिक्षणाधिकारी यांचीही उपस्थिती, कणकवली/प्रतिनिधी     कणकवली ओसरगांव येथील एम.व्ही.डी. कला दालनतर्फे कलादालनच्या नाट्यगृहात शनिवार 15 फेब्रुवारी रोजी सायं.४.३० वा. कोकणभूमी साहित्य कला संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ कवी तथा भारत सरकार साहित्य अकादमीचे (मराठी) माजी सल्लागार सदस्य अजय कांडर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनाला मुख्य प्रमुख पाहुण्या म्हणून गोवा येथील सुप्रसिद्ध गायिका, लेखिका डॉ. शकुंतला भरणे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तर प्रमुख अतिथी म्हणून , जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, उपविभागीय पोलिस अधिकारी घनश्याम आढाव, मेडिकल कॉलेज फिजोथेरपी कसालचे चेअरमन सुरज बांदेकर, जिल्हा शिक्षणाधिकारी कविता शिंपी, ओसरगांव शाळा मुख्याध्यापक तथा सम्यक संबोधी साहित्य संस्था सिंधुदुर्गचे अध्यक्ष कवी किशोर डी.कदम आदी उपस्थित राहणार अ...

सिंधुदुर्ग today

इमेज
आयनल मनेरवाडी गावचा सुपुत्र संदेश चव्हाण यांची गुजरात सुरत येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदी निवड ऋषिकेश मोरजकर/नांदगाव  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आयनल मनेरवाडी गावचा सुपुत्र संदेश सूर्यकांत चव्हाण यांची भारतीय पोलीस क्रीडा मंडळ नवी दिल्ली आयोजित पहिल्या टी ट्वेंटी क्रिकेट टूर्नामेंट्साठी गुजरात सुरत येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदी निवड झाली.हि निवड सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रिडाप्रेमींसाठी अभिमानास्पद आहे.तर ग्रामिन भागात आमच्या सोबत टेनिस बॉल क्रिकेट खेळता खेळता एवढी उंची गाठणा-या संदेशने आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपला ठसा उमटविला याचा खुप अभिमान आहे.       कोळोशी -हडपिड हायस्कूल मध्ये शिक्षण घेत असताना संदेशने  अमर सेवा मंडळ आयनल मणेरवाडी संघातून क्रिकेटच्या वाफ्यात पाऊल टाकले,त्यानंतर उत्तम ईलेव्हन कोळोशी व गांगेश्वर क्रिडा मंडळ तरेळे  ज्युनिअर कॉलेज कणकवली येथे जबरदस्त कामगिरीची झलक दाखवून क्रिकेटच्या वाफ्यांच्या मेरा (बांध)फोडून मोठ्या मैदानावर पाऊल ठेवले.यासाठी कै.सुनिल तळेकर, शेखर महाडि...

सिंधुदुर्ग today

इमेज
तोंडवली येथे अक्षरोत्सव प्रदर्शनाला प्रतिसाद  माणसे जमव, माणसे जोड : वसंत सावंत  कणकवली प्रतिनिधी  या सगळ्या मान्यवरांपर्यंत तू पोहचलास, अशीच खूप माणसे जमव, माणसे जोड आणि तुझा हा संग्रह असाच मोठा होवो, समृध्द होत जावो, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वसंत सावंत यांनी केले. ते  तोंडवली येथील सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटीच्या विद्यानगरी मध्ये आयोजित केलेल्या अक्षरोत्सव या संदेश पत्रांच्या प्रदर्शन कार्यक्रमात बोलत होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन सेवानिवृत्त विक्रीकर अधिकारी चंद्रकांत लाड यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वसंत सावंत, सचिव निखिल सावंत, पोर्ट ट्रस्ट मधील सेवानिवृत्त अधिकारी दिगंबर राणे, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक यल्लाप्पा गुंडू दड्डीकर, सेवानिवृत्त पोलिस उमहानिरीक्षक बाळासाहेब गिरी, माझगाव डॉक चे सेवानिवृत्त कर्मचारी प्रदीप गवळी, मुंबई येथील व्यावसायिक सुरेश आदाते, मुंबई पोर्ट ट्रस्ट चे सेवानिवृत्त अधिकारी बाळकृष्ण जाधव, प्रशासकीय अधिकारी प्रा. विनायक चव्हाण, फार्मसी कॉलेज चे प्राच...

सिंधुदुर्ग today

इमेज
सौ. शुभांगी मुंज यांचे निधन. कणकवली प्रतिनिधी  मुळ आंब्रड बाजार येथील सौ.शुभांगी (कांचन) विठ्ठल मुंज यांचे आज सकाळी ११.३० वाजता अल्पशा आजाराने राहत्या घरी टाटा पावर बोरीवली पुर्व मागाठाणे येथे दुःखद निधन झाले आहे. त्या ७९ वर्षांच्या होत्या. कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील कै. रामचंद्र बाबाजी मोरजकर यांची ती मोठी मुलगी होत.तसेच विलास मोरजकर व राजेंद्र मोरजकर यांच्या त्या मोठ्या बहिण होत.        त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक ८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता टाटा पॉवर येथील घरून निघणार आहे.     त्यांच्या पश्चात पती, दोन विवाहित मुलगे,तिनं मुली नातवंडे,पतवंडे , दोन भाऊ, तिनं बहिण असा मोठा परिवार आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
  मोठी स्वप्ने,सुसंगत कृतीनेच सामाजिक संस्थेला उभारी - डॉ महेश अभ्यंकर मालवण टोपीवाला हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघटनेचे ‘व्हिजन वर्कशॉप’ कणकवली/प्रतिनिधी     टोपीवाला हायस्कूल मालवण माजी विद्यार्थी संघटनेचे ‘व्हिजन वर्कशॉप’ मुंबई हॉटेल रेसिडेन्सी, अंधेरी येथे आयोजित करण्यात आले. टोपीवाला हायस्कूलचे माजी विद्यार्थी डॉ महेश अभ्यंकर यांनी या कार्यशाळेचे आयोजन करून माजी विद्यार्थ्यी संघटनेची उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या दृष्टीने काय व कसे प्लॅनिंग करायला हवे या विषयावर चर्चासत्र घेतले. सिंधुदुर्ग, पुणे, अलिबाग, मुंबई येथून  आलेल्या माजी विद्यार्थ्यी/विद्यार्थिनीनी या कार्यशाळेस उपस्थित राहून आपली मते मांडली. वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेले व प्रगल्भ अनुभव असलेले विद्यार्थी एकत्र आल्यामुळे विचारांना चालना मिळाली.            संस्थेची उद्दिष्टये, मूल्ये, दहा वर्षाचे ध्येय, कृतिआराखडा अश्या विविध मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाली.  माजी विद्यार्थ्यांचे वेगवेगळे आठ गट पाडून विविध विषयावर आधारित उद्दिष्टांवरील मुद्दे, आव्हाने यावर प्रश्ना...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव स्वामी मठात ६ फेब्रुवारी रोजी चरण पादुका पालखी सोहळा. नांदगाव प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील नांदगाव मधले वाडी येथील विठोबा रुक्मिणी स्वामी समर्थ स्वयंभू अनुष्ठान सेवा मठ नांदगाव मधली वाडी येथे दरवर्षीप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी महाराज चरण पादुका पालखी सोहळा गुरुवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंत सर्व भक्तांना स्वामी दर्शनासाठी पालखी असणार आहे.तसेच सर्व स्वामी भक्तांना महाप्रसाद देण्यात येणार आहे तरी सर्व स्वामी भक्तांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन विठोबा रुक्मिणी स्वामी समर्थ स्वयंभू अनुष्ठान सेवा मठ नांदगाव यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे ७५ कवींच्या कवितांचा 'सृजनरंग' काव्यसंग्रह प्रकाशित होणार. डॉ. योगिता राजकर, प्रा.मनीषा पाटील, मनीषा शिरटावले यांचे संपादन. कोकणबरोबर महाराष्ट्रातील नव्या - जुन्या कवींचा सहभाग. संस्थेचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर, कार्यवाह सुरेश बिले यांची माहिती. कणकवली/प्रतिनिधी       सिंधुदुर्गातील समाज साहित्य प्रतिष्ठान ही साहित्य चळवळ नव्या जुन्या लेखक कवींना प्रेरणा देण्यासाठी कार्यरत असते. आता या पार्श्वभूमीवर कोकण बरोबर महाराष्ट्रातील नव्या जुन्या 75 कवींच्या 75 कवितेचा सहभाग असणारा 'सुजनरंग ' हा प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात येत आहे. पुढील पंधरा दिवसात हा काव्यसंग्रह प्रकाशित होत असून या संग्रहाचे संपादन डॉ. योगता राजकर (वाई), प्रा.मनीषा पाटील (कणकवली) आणि मनीषा शिरटावले( सातारा) या तीन कवयित्रीनी केले असल्याची माहिती समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर आणि सचिव सुरेश बिले यांनी दिली.      समाज साहित्य प्रतिष्ठानचे चौथे साहित्य संमेलन मालवण नाथ पै सेवांगण येथे ज्येष्ठ कवी प्रफुल्ल शिलेदार यांच्या अध्यक्षतेखाली डिसे...

सिंधुदुर्ग today

इमेज
हुलेवाडी येथील अनंत हुले यांचे निधन.  नांदगाव पोलीस पाटील यांना पितृशोक.   नांदगाव प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील हरकूळ खुर्द हुलेवाडी येथील अनंत काशिराम हुले वय ७५ यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांचे ते वडील होत.        त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, विवाहित मुलगी, सुन , नातवंडे, बहिण असा मोठा परिवार आहे .हरकूळ खुर्द हुलेवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यावेळी हरकूळ, फोंडाघाट, नांदगाव,कोंडये परिसरातील अनेक नागरिक अंत्यसंस्कार वेळी उपस्थित होते.