सिंधुदुर्ग today
कोळोशी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ.
पालकमंत्री नितेश राणे यांनी निधी उपलब्ध करून दिल्याने ग्रामस्थांनी मानले आभार
नांदगाव प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील कोळोशी येथे आज शिवजन्मोत्सव निमित्ताने विविध विकास कामांचा शुभारंभ भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर यांच्या हस्ते करण्यात आला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याने ग्रामस्थांनी आभार मानले आहे.
या विकास कामांमध्ये कोळोशी ग्रामपंचायत कार्यालय नवीन इमारत बांधणे, मुख्य स्मशानभूमी सुशोभीकरण करणे, देवगड निपाणी रस्ता ते कुलस्वामिनी मंदिर खडीकरण व डांबरीकरण करणे या कामांचे शुभारंभ आज करण्यात आले आहे.
यावेळी कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर, उपसरपंच अतुल गुरव, भाजपचे तालुकाध्यक्ष सरचिटणीस पंढरी वायंगणकर, शक्ती केंद्र प्रमुख भाई मोरजकर, सुशील इंदप, सोसायटी चेअरमन संतोष चव्हाण, शैलेश इंदप,कोळोशी ग्रामपंचायत अधिकारी मंगेश राणे, निरज मोरये, रज्जाक बटवाले,वाघमारे, आप्पा इंदप, दादा कुलकर्णी,छोटु खोत,चंद्रकांत इंदप, बबन गुरव , लक्ष्मण मेस्त्री , प्रकाश पावसकर विजय राणे,विजय इंदप ,श्रीधर इंदप , सत्यवान सुर्वे ,बाबु परब ,सान्वि चव्हाण,ग्रामपंचायत सदस्य सुचिता पोकळे, मिनाक्षी जाधव, सानिया इंदप, सिध्दार्थ तांबे, अनुजा आचरेकर आदी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा