सिंधुदुर्ग today



कणकवली शहरातील दुकानांतील  अमराठी फलका संदर्भात  मनसेने वेधले नगरपालिका मुख्याधिकारी यांचे लक्ष.

शासन निर्णयाप्रमाणे अमंलबजावणी करण्याची मागणी. 

कणकवली प्रतिनिधी 

               मराठी राजभाषा दिनानिमित्त कणकवली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने कणकवली शहराध्यक्ष श्री.योगेश कदम यांचे नेतृत्वाखाली कणकवली नगरपंचायत च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील मॅडम यांची भेट घेऊन कणकवली शहरातील काही दुकाने व आस्थापना यांचे फलक नगरपंचायत प्रशासनाने नोटीस देऊनही व शासन निर्णय असून ही फलक बदल केलेले नाहीत त्याबद्दल निवेदन व चर्चा करून लक्ष वेधले तसेच कणकवली शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील मॅडम यांना सांगितले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कणकवली तालुका सचिव श्री.संतोष कुडाळकर,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री.अनिकेत तर्फे,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कणकवली शहराध्यक्ष श्री.योगेश कदम व मनसैनिक श्री.श्रीकांत सादये  हे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today