सिंधुदुर्ग today
नांदगाव येथील आगीत भस्मसात झालेल्या मालमत्तेचे १९ लाख ७१ हजारांचे नुकसान
तर बाजूला असलेल्या किराणा माल व कोल्ड्रिंक्स चे ३,४० हजार नुकसान
ऋषिकेश मोरजकर/नांदगाव
कणकवली तालुक्यातील नांदगाव मोरये वाडी येथील मनोहर आत्माराम बिडये व पुजा देवेंद्र बिडये यांच्या सामाईक बंद घराला काल रात्री ८:३० सुमारास अचानक आग लागली होती.या आगीत पुर्ण घर आणि दुकान जळून बेचिराख झाले होते.याचा आज नांदगाव मंडळ अधिकारी आत्मबोध जाधव व नांदगाव तलाठी सुदर्शन अलकुटे यांनी पंचनामा केला असता मनोहर आत्माराम बिडये व पुजा देवेंद्र बिडये यांचे पूर्ण राहते घर, घरातील साहित्य इलेक्ट्रॉनिक वस्तू, ७ तोळे सोने, असे एकूण १९, लाख ७१ हजार रुपयांचे नुकसान झाले तर बाजूला असलेल्या त्यांच्याच मालकीच्या गाळ्यात लवू राजाराम लाड हे किराणा दुकान, कोल्ड्रिंक्स, इतर साहित्य होते त्यांचे एकूण ३,४०, हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद झाली आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज कणकवली तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांनी नांदगाव येथील जळीत ग्रस्त घराला भेट देत पाहणी केली. व तलाठी तसेच विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा