सिंधुदुर्ग today

 


प्रितगंध फाउंडेशन मुंबई यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य आदर्शवत -नागेश मोरये

      कणकवली प्रतिनिधी 

       प्रितगंध फाउंडेशन मुंबईचे अध्यक्ष संतोष महाडेश्वर, खजिनदार शिवानी महाडेश्वर आणि त्यांचे सहकारी यांनी  फाउंडेशनच्या वतीने केंद्र शाळा नांदगाव नं.१ मधील पाच गरजू विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेच्या माध्यमातून प्रत्येकी ३०० रू आर्थिक सहाय्य केले.तसेच शाळेतील सर्व एकूण ५६ मुलांना कंपासपेटी व खाऊ वाटप केले. शिक्षण सहाय्यक मंडळ नांदगाव चे अध्यक्ष नागेश मोरये यांनी प्रितगंध फाउंडेशनच्या या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले व असेच सामाजिक व शैक्षणिक उपक्रम समाजासाठी राबवावेत यासाठी शुभेच्छा दिल्या.

         यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष महाडेश्वर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,आपण समाजाचे काही ना काही देणे लागतो.यासाठी आम्ही अनेक सामाजिक उपक्रम राबवितो.शाळेतील गरजू मुलांना सहकार्य करताना आपल्याला  विशेष आनंद वाटतो.

         शाळेचे मुख्याध्यापक सुहास सावंत यांनी फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष महाडेश्वर यांनी गेल्यावर्षीही पाच मुलांना आर्थिक लाभ दिलेला होता आणि यावर्षीही पाच मुलांना आर्थिक सहाय्य आणि सर्व मुलांना शैक्षणिक साहित्य वितरीत करून सर्वांपुढे एक आदर्श ठेवला आहे त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.याप्रसंगी शाळेतील पदवीधर शिक्षक संतोष देसाई.प्रतिमा पोकळे, उपशिक्षिका गितेश्वरी वळंजू व दिपिका चव्हाण उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today