सिंधुदुर्ग today
नांदगाव मोरयेवाडी येथील आगीत भस्मसात झालेल्या बिडये बंधूंच्या घराची तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांनी केली पाहणी
ऋषिकेश मोरजकर/नांदगाव
नांदगाव मोरये वाडी येथील मनोहर आत्माराम बिडये व पुजा देवेंद्र बिडये यांच्या सामाईक बंद घराला काल रात्री ८:३० सुमारास अचानक आग लागली होती.या आगीत पुर्ण घर आणि दुकान जळून बेचिराख झाले होते . सुमारे एक तासानंतर दाखल झालेल्या अग्निशामक बंबालाही ही आग आटोक्यात येताना कठीण जात होते.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज कणकवली तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांनी नांदगाव येथील जळीत ग्रस्त घराला भेट देत पाहणी केली.
यावेळी त्यांच्या समवेत नांदगाव सरपंच भाई मोरजकर, डी.एम. पाटील ,मंडळ अधिकारी आत्मबोध जाधव, तलाठी सुदर्शन अलकुटे, ग्रामविकास अधिकारी आर.डी.सावंत, नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर, ग्रामपंचायत सदस्य विठोबा कांदळकर, शंकर मोरये, संतोष बिडये, आदी स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते
रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न
राहत्या घराला आग लागल्यानंतर जवळपास एक तासानंतर कणकवली येथील अग्निशमन बंब दाखल झाला. तोपर्यंत आगीनी चौहोबाजूने रौद्र रूप धारण केले होते. यामुळे आगीवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले. बंब मधील पाणी संपल्यानंतर पुन्हा पाणी भरुन आणण्यात आले. ते ही पाणी संपल्यावर ११.१५ वा. बंब कणकवली ला जायला गेला. तोपर्यंत आतील कपाट मधील कपडे अशा वस्तू धुमसत असलेल्या पुन्हा ११.३० पेट घेतला. मोरये वाडी बिडये वाडी येथील स्थानिक ग्रामस्थांचे उशिरा पर्यंत आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा