सिंधुदुर्ग today
बेकायदा एलईडी मासेमारी करताना बोटीवर कारवाई
मत्स्य विभागाने पहाटेच्या वेळी केली देवगड समुद्रात कारवाई
बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या बोटीसह पाच कामगारांना घेतले ताब्यात
देवगड (प्रतिनिधी)
देवगड समुद्रात अनधिकृत रित्या एलईडी फिशिंग करताना बोटीवर मत्स्य विभागाने कारवाई केली आहे. एलईडी चा प्रकाशात बेकादेशीरपणे मासेमारी करणाऱ्या पाच कामगारांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई देवगड समुद्रकिनाऱ्यापासून १८ वाव समुद्रात करण्यात आली आहे. या कारवाईने पुन्हा एकदा मत्स्य विभाग सतर्क आणि कार्यक्षम असल्याचे दिसून आले.
विघ्नहर्ता नावाची बोट देवगड समुद्रात एलईडी फिशिंग करत असल्याचे मत्स्य विभागाच्या लक्षात आल्यानंतर पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. एलईडी मासेमारी करण्यास बंदी असताना सुद्धा अशा पद्धतीची मासेमारी चोरी चुपे केली जाते, याबद्दल अनेक वेळा विधिमंडळापासून मच्छीमारांपर्यंत तक्रारी करण्यात आलेल्या होत्या. या तक्रारीची दखल घेऊन शासनाने कारवाई अधिकच गतिमान केलेले आहे. आज पहाटे केलेल्या विघ्नहर्ता बोटीवरील कारवाईत पाच कर्मचारी बेकायदेशीर रित्या मासेमारी करत होते.त्यांना ताब्यात घेतले आहे. याबाबत मत्स्य विभाग अधिक तपास करून दंडात्मक व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा