सिंधुदुर्ग today



आयनल मनेरवाडी गावचा सुपुत्र संदेश चव्हाण यांची

गुजरात सुरत येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदी निवड

ऋषिकेश मोरजकर/नांदगाव 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आयनल मनेरवाडी गावचा सुपुत्र संदेश सूर्यकांत चव्हाण यांची भारतीय पोलीस क्रीडा मंडळ नवी दिल्ली आयोजित पहिल्या टी ट्वेंटी क्रिकेट टूर्नामेंट्साठी गुजरात सुरत येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदी निवड झाली.हि निवड सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रिडाप्रेमींसाठी अभिमानास्पद आहे.तर ग्रामिन भागात आमच्या सोबत टेनिस बॉल क्रिकेट खेळता खेळता एवढी उंची गाठणा-या संदेशने आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपला ठसा उमटविला याचा खुप अभिमान आहे.

      कोळोशी -हडपिड हायस्कूल मध्ये शिक्षण घेत असताना संदेशने  अमर सेवा मंडळ आयनल मणेरवाडी संघातून क्रिकेटच्या वाफ्यात पाऊल टाकले,त्यानंतर उत्तम ईलेव्हन कोळोशी व गांगेश्वर क्रिडा मंडळ तरेळे  ज्युनिअर कॉलेज कणकवली येथे जबरदस्त कामगिरीची झलक दाखवून क्रिकेटच्या वाफ्यांच्या मेरा (बांध)फोडून मोठ्या मैदानावर पाऊल ठेवले.यासाठी कै.सुनिल तळेकर, शेखर महाडिक यांचे लाख मोलाचे मार्गदर्शन लाभले.

    आणि काही दिवसांनी   सिंधुदुर्गचा हा युवा क्रिकेटपटू मुंबई पोलीस संघात दाखल झाला.याठिकाणी दिपक पाटील सरांचे महत्वाचे मार्गदर्शन लाभले.तर या सर्वसामान्य कुटुंबातील मुलाला अनेकांचे आशिर्वाद मिळाला.आणि त्याने मग मात्र लेदर बॉल क्रिकेट खेळताना एक एक शिडी पार करत यशाचे शिखर गाठले.

     लेदर बॉल क्रिकेट खेळताना मुंबई येथे आचरेकर सरांनी संदेशला खरा आकार दिला, परिपक्व बनवला .यावेळी रेगे सरांनीही क्रिकेटचे धडे दिले.आणि कामत क्रिकेट क्लबला जॉईन झाला.पुढील कालावधीत एम एम आर एफ फास्ट बॉलिंग ट्रेनिंग सेंटर मध्ये डेनिस लिली सर्वांकडून विशेष ट्रेनिंग घेतले.

   सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशन १६ ते १९ वर्षाखालील टीम साठी कर्णधार तसेच जसजणवाला चार वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व... महाराष्ट्र राज्य सोळा वर्षाखालील व १९ वर्षाखालील महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.एनसीए बेंगलोर एम आर एफ चेन्नई (डेनिस लिली सर) निवड मुंबई पोलीस साठी वीस वर्ष क्रिकेट खेळाडू व पोलीस क्रिकेट अकॅडमी प्रशिक्षण... मुंबई क्रिकेट असोसिएशन १९ व महेंद्रा ट्रॉफी  २३ वर्षांखालील शालिनी भालेकर, एमसीए समर कॅम्प, कांगा लीग टूर्नामेंट ,मॅच ऑबजरवर,बीसीसीआय टूर्नामेंट, मुस्ताक अली लायझन मॅनेजर बिहार टीम अशा अनेक जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या. इंग्लंड येथे वेमब्लि क्रिकेट क्लब कडून काऊंटी स्पर्धेत प्रतिनिधित्व‌ केलं.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today