सिंधुदुर्ग today
नांदगाव तिठा येथे मावळे आम्ही स्वराज्याचे यांच्यावतीने १९ फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव होणार साजरा.
विविध कार्यक्रमांचे आयोजन
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा येथे मावळे आम्ही स्वराज्याचे यांच्यावतीने १९ फेब्रुवारी शिवजयंती निमित्त शिवजन्मोत्सव साजरा होणार आहे.
कार्यक्रम पुढीलप्रमाणे सकाळी ८ वा. अभिषेक, महाआरती, सकाळी ठीक १० वा. भगव्या ध्वजाचे पुजन , सकाळी ११ वा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवकार्य करत असलेल्या विविध संस्थांचे सत्कार , दुपारी २ वा. स्थानिक सुस्वर भजन, दुपारी ३ वा. महिलांसाठी हळदीकुंकू, सायंकाळी ४ वा. होम मिनिस्टर खेळ पैठणीचा, सायंकाळी ६ वा. पावणादेवी समई नृत्य किंजवडे , सायंकाळी ७ वा. जिल्हास्तरीय पारंपरिक नृत्य स्पर्धा अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व शिवभक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन अनिकेत तर्फे यांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा