सिंधुदुर्ग today
मूलभूत कलागुणांचा विकासच महत्वाचा कवी अजय कांडर यांचे कणकवली फ्लोरेट कॉलेज इंटिरियर अँड फॅशन डिझायनिंगच्या वार्षिक स्नेहमेळाव्यात प्रतिपादन फॅशन शो - नृत्य - गाणी यांनी दणाणले सभागृह कणकवली /प्रतिनिधी विद्यार्थीदशेत मुलांच्या कलागुणांना वाव मिळाला तर भविष्य त्यांचं उज्वल असतं. माणसांचा मूलभूत कला विकास महत्त्वाचा असून त्या कलागुणांच्या विकासावर कलावंत जागतिक पातळीवर यश मिळू शकतो. यासाठी मात्र जिद्द - परिश्रम आणि आपल्यातील कलागुणांचे मोल कळायला हवे तरच मोठे यश मिळू शकते. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांनी कणकवली येथे केले कणकवली फ्लोरेट कॉलेज इंटिरियर अँड फॅशन डिझायनिंगचा वार्षिक स्नेहमेळावा कवी अजय कांडर यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली निलायम ब्लू थिएटरच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी बोलताना कवी कांडर यांनी फॅशन डिझाईन या क्षेत्रामध्ये मोठ्या संधी असून आता खेडेगावांमधूनही या क्षेत्रामध्ये मोठी प्रगती करता येते. मात्र यासाठी आपल्यातील संकोचितपणा सोडायला हवा. कोणत्याही धाडसानेच जग जिंकता येते. ही जिद्द नव्या पिढीने बाळगली पाहिजे तरच मोठे यश शक्...