सिंधुदुर्ग today
कलाकार मानधन साठी नांदगाव येथे भरणार कलाकार मेळा.
किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजन.
कणकवली प्रतिनिधी
कलाकार मंडळी यांना पन्नास वर्षे पूर्ण झाली की वृद्ध कलाकार मानधन हे शासन स्तरावरून मिळते . यामध्ये पेटी वादन, तबला वादन तसेच मूर्तिकार, दशावतार कला अशा विविध कलांसाठी सदर मानधन शासनाकडून दिले जाते.
मागील काही दिवसांपूर्वी किशोर मोरजकर ट्रस्टच्या वतीने नांदगाव येथील सर्व कलाकार व्यक्तींना सदर मानधन मिळवून देण्यासाठी ट्रस्टच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले होते. या अनुषंगाने जे कलाकार आहेत त्या आपल्या कलाकारांनी या कला महोत्सव मध्ये आपली कला सादर करावी कला सादर केल्यानंतर त्यांना मान्यवरांच्या हस्ते त्याच ठिकाणी प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहे. आणि हे प्रमाणपत्र त्यांना वृद्ध कलाकार मानधन प्रस्ताव सादर करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तरी नांदगाव येथील वरील कलाकार मंडळींनी लवकरच किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट नांदगाव येथे आपल्या नावाची नाव नोंदणी येत्या 30 डिसेंबर 2023 पूर्वी करावी .असे आवाहन ट्रस्ट अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा