सिंधुदुर्ग today
पोलीस पाटील पदाची तोंडी परीक्षा उद्यापासून.
पोलिस पाटील संदर्भात प्रतिज्ञापत्र करण्यासाठी कणकवली तहसीलदार कार्यालयात झुंबड
कणकवली ऋषिकेश मोरजकर
कणकवली विभागातील कणकवली देवगड वैभववाडी अशा ठिकाणी पोलीस पाटील पदासाठी उद्या दिनांक 22 डिसेंबर 2023 पासून तोंडी परीक्षा सुरू होणार आहे. याकरिता लागणारे पोलीस वेरिफिकेशन दाखला (पोलीस पडताळणी ) काढण्यासाठी तसेच लाभार्थी उमेदवार हा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित व ग्रामपंचायत सदस्य तसेच पुर्ण वेळ नोकरी करत नसल्याचे प्रतिज्ञापत्र करण्यासाठी परीक्षेत पात्र उमेदवारांची कणकवली तहसीलदार कार्यालय झुंबड उडाल्याचे दिसत आहे. पोलीस पडताळणीसाठी सर्वप्रथम ऑनलाइन प्रणाली द्वारे पोर्टला नोंदणी केली जाते. सविस्तर पोलीस स्टेशन वरून पोलीस अधीक्षक कार्यालयाला पाठविला जातो आणि या संपूर्ण प्रोसेस नंतर सदर लाभार्थ्याला पडताळणी दाखला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून दिला जातो. दोनच दिवसापूर्वी लेखी परीक्षेचा रिझल्ट प्रसिद्ध झाल्यानंतर जे पात्र लाभार्थी आहेत अशांनी या पोलीस पडताळणी साठी आता गर्दी केल्याचे दिसत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा