सिंधुदुर्ग today



"सिंधुदुर्गात
 मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना गतिमान पंधरावडा"

कणकवली (ऋषिकेश मोरजकर)

उद्योग मंत्री व विकास आयुक्त (उद्योग) उद्योग संचालनालय मुंबई यांनी दिनांक 18 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2023 पर्यंत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना गतिमान पंधरा घोषित केला आहे. या 15 दिवसांमध्ये जिल्हा उद्योग केंद्र सिंधुदुर्ग यांच्यामार्फत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचे जास्तीत जास्त प्रस्ताव या माध्यमातून गोळा करणे आणि ते ऑनलाईन अर्ज प्रणाली द्वारे पोर्टल भरणे , माहिती देणे प्रचार करण्यात येणार आहे. सदर पंधरावडा मोहीम मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचे अर्ज हे निशुल्क भरून दिले जातील. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात बॅनर आणि ग्रामीण ऑडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचे प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार आहे. या योजनेमधून जास्तीत जास्त लाभार्थ्यांचे अर्ज प्रस्ताव त्यांच्या कागदपत्रांचे स्वीकारून त्यांची तात्काळ छान निघणार असून बँकेकडे अशी प्रकरणे लवकरात लवकर प्राधान्याने मंजूर करून देण्याचा जिल्हा उद्योग केंद्र सिंधुदुर्ग करणार आहे यामध्ये बँकेकडून उपयोगीता प्रमाणपत्रे जमा करणे बँकेत रखडलेले मुख्य रोजगार निर्मिती योजनेची प्रकरणे मार्गी लावणे हा मुख्य हेतू आहे. 

     सदर पंधरावडा कार्यक्रम प्रत्येक तालुक्यात सुरू झालेला असून 19 डिसेंबर पासून या कार्यक्रमास सुरुवात झालेली आहे. याबाबत सर्व लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र सिंधुदुर्ग यांच्याकडून करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today