सिंधुदुर्ग today
फार्मसी व कृषी महाविद्यालय तोंडवली यांच्या वतीने जागतिक एड्स दिनानिमित्त पथनाट्य व प्रभात फेरी
नांदगाव प्रतिनिधी
फार्मसी व कृषी महाविद्यालय तोंडवली यांच्या वतीने आज जागतिक एड्स दिनानिमित्त पथनाट्य व प्रभात फेरी नांदगाव येथे संपन्न झाली आहे.नांदगाव तिठा ब्रिज खाली या विद्यार्थ्यांनी जनजागृती पर पथनाट्य सादर करुन प्रबोधन केले तर नांदगाव बाजार ते तोंडवली कॉलेजपर्यंत प्रभात फेरी ही काढण्यात आली.
यावेळी नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरी वायंगणकर, तोंडवली बावशी ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच दिनेश कांडर,ओटव माजी उपसरपंच राजेश तांबे, नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ तपसे, संस्था प्रतिनिधी विनायक चव्हाण, फार्मसी प्राचार्य तुकाराम केदार,शिक्षक अखिल काणेकर,सील्वी घोन्सालवीस ,रोहण डोंगरे,संजय चोथे, सुशांत शेटये , उर्मिला पाटील,रेनुका भागवत ,सागर मोहिते, कविता पवार,उदय भोई,कणकवली तालुका पत्रकार संघाचे सहसचिव उत्तम सावंत, पत्रकार ऋषिकेश मोरजकर, पत्रकार सचिन राणे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा