सिंधुदुर्ग today



बुद्धीच्या विकासासाठी बाल वयात साहित्य वाचन महत्त्वाचे

एकदिवशीय बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन

राजे प्रतिष्ठान आणि ओसरगांव शाळा नंबर १तर्फे संमेलनाचे आयोजन

कणकवली/प्रतिनिधी

    शालेय जीवनात मुलांचा बौद्धिक विकास होणे महत्त्वाचे असते. यासाठी बाल वयातच मुलांना साहित्य वाचण्याची आवड निर्माण करणे गरजेचे आहे.राजे प्रतिष्ठान सिंधू आणि ओसरगांव शाळा नंबर १ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या एक दिवशीय बालकुमार साहित्य कला संमेलनातून मुलांना वाचनाची आवड निर्माण होईल. आणि भविष्यात याच मुलांमधून उद्या एखादा साहित्यिक कलावंत निर्माण होईल. त्यामुळे या संमेलनाचे मोल महत्वाचे आहे. यासाठी हे संमेलन आयोजित करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच असे प्रतिपादन नामवंत कवी अजय कांडर यांनी ओसरगांव येथे आयोजित केलेल्या एकदिवशीय बालकुमार साहित्य कला संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना केले.

    ओसरगांव शाळा नंबर १ च्या पटांगणावर राजे प्रतिष्ठान सिंधू आणि ओसरगांव शाळा नंबर १तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाचे उद्घघाटन जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्गचे प्राचार्य सुशीलकुमार शिवलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना कवी कांडर यांनी अशा संमेलना मधून मुलांची भाषिक समज लहानपणीच वाढते यासाठी अशी संमेलने वारंवार आयोजित केली जायला हवीत असेही आग्रहाने सांगितले. यावेळी मंचावर तालुका गटशिक्षण अधिकारी किशोर गवस, संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा मुख्याध्यापक किशोर कदम,रंगकर्मी कल्पना बांदेकर, राजे प्रतिष्ठान सिंधूचे अध्यक्ष विवेक परब, ओसरगाव सरपंच

सुप्रिया कदम, निपुण भारतचे प्रमोद तांबे, केंद्रप्रमुख सुरेश हरकुळकर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष जिवबा अपराज, बोर्डवे सरपंच  वेदांची पाताडे ,आदी उपस्थित होते.

   प्राचार्य शिवलकर म्हणाले, लहानपणीच मुलांमधे प्रत्येक गोष्टीचे कुतूहल जागृत होत असते. त्यातून त्यांना विविध प्रश्न पडत असतात. विविध कला  याच वयात त्यांना खुणावत असतात.अशावेळी अशी साहित्य कला संमेलने फार उपयुक्त असतात. राजे प्रतिष्ठान आणि ओसरगाव प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनातून मुलांना शिक्षणाच्या पलीकडे खूप मोठे कला जग असते याची जाणीव होईल. आणि भविष्यात त्यांच्या कलागुणांमध्ये मोठी वाढ होईल. हेच या संमेलनाचे खरे यश आहे.

     किशोर कदम म्हणाले, या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी माझी निवड करण्यात आली याचा मला आनंद होत आहे. ओसरगाव शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून रुजू झालो तेव्हापासून या गावातील ग्रामस्थांनी चांगले सहकार्य केले. आज हे संमेलन अँड.विलास परब, राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक परब आणि त्यांचे सहकारी, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष जिवबा अपराज आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच यशस्वी होत आहे. शिक्षणापलीकडे ज्ञान देण्याचा आमचा प्रयत्न सतत असतो. याच पार्श्वभूमीवर हे संमेलन येथे विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले आहे. यावेळी किशोर गवस, विवेक परब यांनी विचार व्यक्त केले.

    मुक्त साळवे विचार मंचावर संपन्न झालेल्या या संमेलनात प्रसिद्ध निवेदक राजेश कदम यांनी कविता अशीच स्फुरते या विषयावर विचार व्यक्त केले.खजिना कथांचा..आविष्कार कथाभिनयाचा या विषयावर  कथालेखिका, सिने अभिनेत्री कल्पना बांदेकर यांनी मार्गदर्शन केले.किमया रंग-रेषांची..गट्टी चित्रकलेशी या विषयावर प्रवीण चिंदरकर यांनी मार्गदर्शन केले.नृत्य मार्गदर्शन मार्गदर्शन सुदिन तांबे यांनी केले.पोलीस पाटील सौ.आंगणे, गोरेश शिरोडकर ,बबली राणे ,जगन्नाथ राणे ,नामदेव राणे , संदेश नाईक, सुदर्शन नाईक,संजय जाधव ,प्रकाश चौकेकर, किशोर तांबे, बाळकृष्ण आलव, दिगंबर आलव, मनोज चौकेकर सुमन चौकेकर ,सुप्रिया अपराध  जान्हवी  अपराध,रसिका  तांबे,सिध्दि कदम , पल्लवी डुकरे,सायली मोहीते, अपेक्षा चव्हाण,अक्षता राणे, आदी उपस्थित होते.

   सूत्रसंचालन शैलेश तांबे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहशिक्षिका प्रमिता तांबे, शीतल दळवी,श्रीमती जाधव यांनीही परिश्रम घेतले.कार्यक्रमाची सुरुवात इशिका तांबे व आलिया तांबे यांच्या नृत्याने करण्यात आली. संमेलनाचा प्रारंभ ओसरगाव तलाव ते ओसरगाव शाळा इथपर्यंत ग्रंथ दिंडी काढून करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today