सिंधुदुर्ग today



कणकवली येथे २४ डिसेंबर पासून  नाथ पै एकांकिका स्पर्धा !

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे आयोजन 

कणकवली प्रतिनिधी 

कणकवली : येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने ४६ वी राज्यस्तरीय बॅ. नाथ पै एकांकिका स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला २४ डिसेंबर पासून संस्थेच्या नाट्यगृहात प्रारंभ होणार आहे.

    या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ २४ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होईल.  त्यानंतर शालेय गटातील एकांकिका स्पर्धेला प्रारंभ होईल.  रात्री ९ वाजता आरती प्रभू कला अकादमी, कुडाळ  यांची 'घुसमट'- लेखनः मेधा मराठे, रात्री १०वाजता कुडाळ हायस्कूल कला विभाग, कुडाळ यांची  'देवाची फुले' लेखनः सई परांजपे, रात्री ११ वाजता शिरगाव हायस्कूलची 'आभाळ' लेखन- डॉ. राजेंद्र चव्हाण, रात्री १२ वाजता शिंदे अकॅडमी, कोल्हापूरची 'अस्तित्व' लेखनः गोविंद गोडबोले.

२५ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ यांची  'पुतळे झाली माणसे'  लेखनः मेधा मराठे,

रात्री १०वाजता विद्यामंदिर हायस्कूल, कणकवलीची 'आऊट ऑफ कंट्रोल' लेखनः मनोज मेस्त्री. या एकांकिका होतील. 

त्यानंतर खुल्या गटामधील एकांकिका होतील.त्यामध्ये रात्री ११ वाजता क्रिएटिव्ह कार्टी, मुंबई, 'इंटरोगेशन'  लेखनः चैतन्य सरदेशपांडे,रात्री १२ वाजता डी. बी. जे. महाविद्यालय, चिपळूण यांची 'हॅप्पी फादर्स डे ' लेखनः संकेत हळदे, रात्री १ वाजता कलासक्त, मुंबई यांची  'संपर्क क्रमांक' लेखनः संदेश जाधव.

२६ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता  खुल्या गटातील नटरागिणी कलामंच, मालवण यांची 'शोक पर्व' लेखनः प्रमोद काळे,

रात्री १० वाजता एस.पी. कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर, चिपळूण यांची  'कॅलिडोस्कोप' लेखनः ऋषीकेश तुराई,

रात्री ११वाजता फोर्थ वॉल थिएटर डिचोली, गोवा यांची 'अमर अमृता' लेखनः विजयकुमार नाईक, रात्री१२ वाजता महावीर महाविद्यालय, कोल्हापूर यांची 'निर्झर' लेखनः भारत जीवन, चारुदत्त प्रभूखोत,

रात्री १वाजता कलांगण, मालवणची ' होय म्हाराजा' लेखनः किरण करवडकर,

२७ डिसेंबर  रोजी रात्री ९ वाजता बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ यांची 'कुकुचकू' लेखनः मेधा मराठे, रात्री १० वाजता मराठवाडा मित्र मंडळ, वाणिज्य महाविद्यालय पुणे यांची 'सिनेमा' लेखनः मंदार इंगळे , श्रेयश जोशी, रात्री ११ वाजता  गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर यांची 'बिईंग अँड नथींग' लेखनः ऐश्वर्या पाटील, रात्री १२ वाजता ढ मंडळी, कुडाळ  यांची 'डीम टँग डिटँग' कथा: रत्नाकर मतकरी, नाट्य रुपांतरः विठ्ठल तळवलकर यांनी केले आहे. एकांकिका झाल्यानंतर रात्री १ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ होईल. या सर्व एकांकिकांचा लाभ नाट्य रसिकांनी घ्यावा.असे आवाहन आचरेकर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष ऍड.नारायण देसाई,कार्यवाह शरद सावंत यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today