सिंधुदुर्ग today



नांदगाव उर्दू प्राथमिक शाळेत अल्पसंख्याक हक्क दिन साजरा.

नांदगाव प्रतिनिधी

नांदगाव उर्दू प्राथमिक शाळेत १८डिसेबर रोजी अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्यात आला.

  अल्पसंख्याक आयोगाचे परिपत्रक नुसार नांदगाव येथील उर्दू प्राथमिक शाळेत निबंध स्पर्धा घेण्यात आली ४ते ७वी पर्यंत च्या विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता

  या स्पर्धेत भाग घेतलेल्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला आहे.

  प्रथम क्रमांक आरहान सिराज बटवाले ,द्वितीय क्रमांक महंमद आरहान मुश्ताक कितुर ,तिसरा क्रमांक आसफिया मुश्ताक बोबडे यांचा सत्कार नांदगाव उपसरपंच इरफान साटविलकर सामाजिक कार्यकर्ते रज्जाक बटवाले व निसार काझी यांच्या हस्ते प्रमाणपत्र व शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला

  या वेळी अल्पसंख्याक हक्क दिन हा शासनाचा कार्यक्रम असून अल्पसंख्याक हक्क दिना निमित्त विचार मांडले व हक्क काय आहे  हे सांगितले आहे.

  या वेळी नांदगाव उर्दू प्राथमिक शाळेचे शिक्षक मुश्ताक कितुर सर तसमिया बटवाले फिझा नावलेकर उपस्थित होते. 

  या वेळी आलेल्या मान्यवरांचे पूषपगुछ देऊन स्वागत करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today