सिंधुदुर्ग today
नांदगाव व्यापारी संघटना अध्यक्षपदी महेश उर्फ पपी सापळे तर सचिवपदी ऋषिकेश मोरजकर
उपाध्यक्षपदी यासिर मास्के.
८ जानेवारी रोजी होणार श्री सत्यनारायण महापूजा
कणकवली |प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील नांदगाव व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी महेश उर्फ पपी मधूकर सापळे तर सचिवपदी ऋषिकेश किशोर मोरजकर, उपाध्यक्षपदी यासिर सलीम मास्के, सहसचिव हनुमंत मधुकर म्हसकर, खजिनदार दिलिप फोंडके यांची बिनविरोध निवड झाली आहे.
मागील कार्यकारिणी यांनी यशस्वीपणे ८ वर्ष सांभाळली असून आता नव्याने होणारी कार्यकारिणी ही १ वर्षांसाठी असेल. असे ठरविण्यात आले आहे.
नांदगाव व्यापारी संघटना बैठक नुकतीच तत्कालीन व्यापारी संघटना अध्यक्ष पंढरी वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी नागेश मोरये, नांदगाव सरपंच रविराज मोरजकर तसेच आजी माजी सर्व व्यापारी पदाधिकारी , सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यकारिणी सल्लागार म्हणून नागेश मोरये, पंढरी वायंगणकर, रज्जाक बटवाले,कमलाकर महाडिक सुभाष बिडये तर सदस्य म्हणून मजिद बटवाले, प्रदीप हरमळकर, उत्तम सावंत, उमेश डगरे, संतोष मिराशी बुवा, योगेश सदडेकर, मन्सूल बटवाले, कमलाकर पाटील यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाली आहे.
व्यापारी संघटना नांदगाव च्या वतीने सोमवार दिनांक ८ जानेवारी २०२४ रोजी श्री सत्यनारायण महापूजा करण्याचे ठरविण्यात आले आहे.
व्यापारी संघटना नांदगाव च्या नवीन पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांचे स्वागत करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा