सिंधुदुर्ग Today न्यूज
माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून महिलांना टेलर साहित्य वाटप. शिलाई मशीन दिलेल्या लाभार्थ्यांना टेलर साहित्याचा लाभ. ◼️सिंधुदुर्ग न्यूज: प्रतिनिधी मानव साधन विकास संस्था संचलित जनशिक्षण संस्थान, सिंधुदुर्ग , किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट नांदगाव या परिवर्तन केंद्र अंतर्गत माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार सुरेश प्रभु यांच्या प्रयत्नातून गोवा विमानतळ प्राधिकरण CSR निधीतून महिला सक्षमीकरण करण्यासाठी मागील वर्षी 10 महीलांना शिलाई मशीनचा लाभ समन्वयक संस्था किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट नांदगाव यांच्या सहकार्याने नांदगाव येथील महीलांना देण्यात आला होता. आता याच महीलांना सुरेश प्रभु यांच्या प्रयत्नातून गोवा विमानतळ प्राधिकरण CSR निधीतून कात्री,मेजर टेप ,टेलर लाकडी मोजमापे पट्टी,रिळ , बॉबीन , रिंग केस, टेलर खडू , मशिन सुई आदी महीलांचे साहीत्य नांदगाव येथील परिवर्तन केंद्र असलेल्या किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट च्या सुपूर्द करण्यात आले होते. याचे आज वितरण करण्यात आले आहे यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, किशोर मोरजकर चॅरिट...