सिंधुदुर्ग Today न्यूज
ओबीसी महामंडळ थकीत कर्ज लाभार्थ्यांनी 50 टक्के सवलत योजनेचा लाभ घ्यावा.
सिंधुदुर्ग Today न्यूज
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांची उप कंपनी शामराव पेजे कोकण इतर मागास आर्थिक विकास महामंडळ लिमिटेड सिंधुदुर्ग यांच्यामार्फत विविध कर्ज योजने अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगारांकरिता अल्प व्याजदरामध्ये कर्ज वितरित करण्यात आलेले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या महामंडळाच्या थकीत कर्ज रक्कम असलेल्या लाभार्थ्यांना जाहीर आवाहन करण्यात येते की, ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एक रकमी भरणा करण्याचा लाभार्थ्यांस थकीत व्याजदर रकमेत 50 टक्के सवलत देण्या बाबतची एक रकमी परतावा ओ.टी.एस. योजना दिनांक 31 . 3 . 2024 पर्यंत राबविण्यात येत आहे .त्यानुसार महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेऊन सहकार्य करावे . असे आवाहन ओबीसी महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक निशिकांत नार्वेकर यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा