स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात 75 हजार पदे भरण्यात येणार

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात शासनामध्ये 75 हजार पदे भरण्यात येणार असल्याचे ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन यांनी सर्व जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना 12 एप्रिल 2023 च्या पत्राद्वारे कळविण्यात आलेले आहे.

         स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात अंदाजे 75000 सरळ सेवा कोट्यातील पदे भरण्याचा शासनाने निर्धार केला असून 15 ऑगस्ट 2023 पूर्वी सदर पदे भरावयाची आहेत ग्रामविकास विभागाच्या अखेरीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट - क मधील आरोग्य व इतर विभागातील सर्वात संवर्गाच्या भरतीचा कालबद्ध कार्यक्रम विभागाच्या अनुक्रमे दिनांक 21 ऑक्टोबर 2022 व 15 नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णयामुळे जाहीर करण्यात आला होता. सदर जाहिरातीद्वारे सर्व जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील एकूण 18 हजार 939 पदे भरली जाणार आहेत.

      विभागाच्या दिनांक 16 मार्च 2023 च्या शासन निर्णयान्वये दिनांक 31 डिसेंबर २०२३ पर्यंत जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जिल्ह्यांकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादित दोन वर्ष इतकी शिथिलता देण्यात आलेली आहे.

तसेच माहे मार्च 2019 च्या जाहिरातीप्रमाणे यापूर्वी अर्ज केलेले / भरलेले आहेत अशा सर्व उमेदवारांना 31 डिसेंबर 2023 पर्यंत जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरिता अर्ज करण्यास पात्र करण्यात आले आहे. तसेच मार्च 2019 च्या जाहिरातीप्रमाणे सदर पदांसाठी असलेली शैक्षणिक अहर्ता ही पुढील फक्त एका परीक्षेसाठी कायम ठेवण्यात आली असल्याचे महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या वतीने सर्व जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

     याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी 12 एप्रिल 2023 रोजी ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन यांनी सर्व जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवलेले पत्र पहा .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today