सिंधुदुर्ग Today डिजिटल न्यूज
कासार्डे विद्यालयातील २९ कराटे खेळाडूंचे बेल्ट परीक्षेत अभिनंदनीय यश...
तीन खेळाडू ब्लॅक बेल्ट परीक्षेसाठी पात्र
तळेरे : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा गेन्श्युरियो कराटे असोसिएशन - आयडियल ज्युडो कराटे जिल्हा असोसिएशन व सिंधुदुर्ग जिल्हा कराटे असोसिएशन यांच्या वतीने कासार्डे माध्यमिक विद्यालयातील 'कुतरकर नाट्यगृहात 'आयोजित इंडियन गेन्श्युरियो कराटे फेडरेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या बेल्ट परीक्षेत कासार्डे माध्यमिक विद्यालयातील 29 खेळाडूंनी अभिनंदनीय यश संपादन केले आहे.
कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालयात सन.१९९७ पासून ज्युदो कराटे प्रशिक्षक तथा विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड व त्यांच्या आनेक प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सलग २६ वर्षे मोफत ज्यूदो व कराटे वर्ग सुरु आहे.
या वर्षी बेल्टग्रेडेशन परीक्षेसाठी बसलेले काही खेळाडू ५ ते ६ वर्षापासून तर काही खेळाडू २ वर्षापासून कराटे कलेचे धडे गिरवत आहेत.
यशस्वी खेळाडू व यश संपादन केलेला कलर बेल्ट पुढीलप्रमाणे -
ब्ल्यू बेल्ट-
आदर्श दीपक जाधव, सोहम दिगंबर लिंगायत,
शुभम सुरेश राठोड, दुर्वास संजय पवार, अमोल दीपक जाधव, आश्मेष अनिरुद्ध लवेकर,कु.धैर्य अरविंद परब, कु.मृणाल संदीप सावंत, कु.जिया भीमराव इंगळे, कु.विधी संजय चव्हाण, कु.पालवी विजय शेनवी, कु.मुग्धा भरत पाताडे, कु.साक्षी संतोष तेली, कु.सना रहमान शेख, कु.दीक्षा बन्सीलाल
सुथार,कु.वैदही मधुसूदन राणे, कु.साक्षी विनायक सरवणकर,कु.सावनी प्रशांत शेट्ये,कु.दुर्वा प्रकाश पाटील व कु.हर्ष संदीप ब्रह्मदंडे आदी खेळाडू ब्ल्यु बेल्ट परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
परपल बेल्ट-
कु.नंदिता प्रवीण मत्तलवार, कु.आर्या अमित राणे,कु.अनुष्का दीपक जाधव, कु.रिद्धी अरविंद परब,दीपक गोविंद जाधव व विश्वास चंदू चव्हाण आदी खेळाडू परपल बेल्ट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
ब्राऊन बेल्ट-
युवराज संजय राठोड, पार्थ प्रकाश पाटील व तुषार गोविंद जाधव आदी सिनियर खेळाडू ब्राऊन बेल्ट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
कासार्डे येथे सलग दोन दिवस सुरू असलेल्या या शिबिरात खेळाडुंना गेन्श्युरियो कराटे डो ऑफ इंडियाचे चिफ इन्स्टक्टर तथा राष्ट्रीय पंच सेन्साई राजेश गाडे(मुंबई) यांचे विशेष मार्गदर्शन लाभले . त्यांनी या शिबिरात कराटे मधील अँडव्हान्स टेक्निक तसेच विविध कौशल्याचा आणि काताजचा अभ्यासपूर्ण प्रशिक्षण घेतले. त्या नंतर शेवटच्या सत्रात सहभागी खेळाडूंची विविध टप्प्यांनुसार बेल्ट परीक्षा संपन्न झाली. या परीक्षार्थ्यी मधून सिनियर तीन खेळाडू युवराज राठोड,पार्थ पाटील व तुषार जाधव हे खेळाडू ब्लॅक बेल्ट परीक्षेसाठी पात्र ठरलेले आहे.
सर्व उत्तीर्ण खेळाडूंना इंडियन गेन्श्युरियो कराटे डो ऑफ इंडिया फेडरेशनच्या वतीने प्रमाणपत्र व बेल्ट देऊन सन्मानित करण्यात आले.
अमोल, साक्षी,नंदिता व अनुष्काचा उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून सन्मान
या प्रशिक्षण शिबिरात सहभागी शिबीरार्थीमधून अमोल जाधव,कु.साक्षी तेली, कु.नंदिता मत्तलवार व कु.अनुष्का जाधव या चार खेळाडूंचा 'बेस्ट शिबीरार्थी' म्हणून सेन्साई राजेश गाडे यांनी अभिनंदन केले. उपस्थित पालक प्रतिनिधी श्री. लिंगायत यांच्या हस्ते या चारही खेळाडूंचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक तथा सिंधुदुर्ग जिल्हा कराटे असोसिएशन सचिव दत्तात्रय मारकड,जिल्हा पदाधिकारी व प्रशिक्षक अभिजीत शेट्ये,राकेश मुणगेकर, निळकंठ शेट्ये,सिध्देश माईणकर, दिपेश कानसे, रूपेश कानसे, राहूल शेट्ये,सोनु जाधव,वैभव माळवदे,प्रविण कानसे,व सौ.दर्शना मारकड आदी प्रशिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.
या सर्व यशस्वी खेळाडुंचे इंडियन गेन्श्युरियो कराटे डो ऑफ इंडिया फेडरेशनचे चिफ एक्झामिनर तथा वर्ल्ड कराटे फेडरेशनचे मान्यताप्राप्त प्रशिक्षक सिहान संदीप गाडे (मुंबई), कासार्डे विकास मंडळ मुंबईचे सर्व पदाधिकारी स्थानिक व्यवस्था समितीचे सर्व पदाधिकारी तसेच स्कुल कमिटीचे सर्व पदाधिकारी तसेच विद्यालयचे प्राचार्य एम.डी. खाड्ये, पर्यवेक्षक एन.सी. कुचेकर, कराटे असोसिएशनचे जिल्हा सचिव दत्तात्रय मारकड तसेच विद्यालयच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
बेल्ट परीक्षा उत्तीर्ण सर्व खेळाडुंचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा