भारतीय मजदूर संघ तळेरे विभागाचा कामगार मेळावा
दीपगौरव पुरस्काराने सन्मानित
पत्रकार निकेत पावसकर यांचाही समावेश
तळेरे, दि. 20 :
भारतीय मजदूर संघाचे सक्रिय कार्यकर्ते स्व. दिपक गुरव यांच्या स्मृती निमित्ताने साळिस्ते येथे भारतीय मजदूर संघ तळेरे विभागाने कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त साळिस्ते गावातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तिंना दीपगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या मेळाव्याचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन हरी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग कामगार महासंघाचे कार्याध्यक्ष बाळा साटम, चंद्रकांत हरयाण, साळिस्ते सरपंच प्रभाकर ताम्हणकर, उपसरपंच जितेंद्र गुरव, भारतीय मजदूर संघ तळेरे विभागाचे अध्यक्ष अशोक जगताप, पोलिस पाटिल गोपाळ चव्हाण, तंटामुक्त अध्यक्ष लक्ष्मण ताम्हणकर, हिंमत कांबळे, ओमकार गुरव, संतोष पाष्टे आदी उपस्थित होते.
यावेळी साळिस्ते गावातील पत्रकार, शिक्षण, वैद्यकीय, सामाजिक अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. यामध्ये निकेत पावसकर (पत्रकार), रघुनाथ लिंगायत (महावितरण), आदित्य लिंगायत (सामाजिक), प्राजंळ बारसकर (वैद्यकीय), सविता चव्हाण (अंगणवाडी), दीपा ताम्हणकर (अंगणवाडी सेविका), संजना गुरव, प्रशांत बारसकर (ग्रामपंचायत कर्मचारी), वैशाली लिंगायत, प्रा. नरेश शेट्ये (शिक्षण), मृणाली पिसे, सिताराम परदेशी (शिक्षण), गोपाळ चव्हाण (पोलिस पाटिल), दीपाली गुरव, सत्यवान घाडिगावकर, रवींद्र पाष्टे, माधवी बुचडे, संगीता वळवी, वैभव पारधिये (शिक्षण) या सर्वांना दिपगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
तसेच, बाळा साटम, साळिस्ते सरपंच प्रभाकर ताम्हणकर, उपसरपंच जितेंद्र गुरव, महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष लक्ष्मण ताम्हणकर, हिंमत कांबळे, संतोष पाष्टे, अशोक जगताप, लिंगायत बंधू, अनंत गुरव, संतोष रांबाडे यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी बाळा साटम, चंद्रकांत हरयाण, सत्यवान घाडिगावकर, निकेत पावसकर, विजय गुरव यांनी मनोगत व्यक्त केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा