सिंधुदुर्ग न्यूज
तळेरे, दि. :
मुंबई येथील अखिल भारतीय महिला मराठा महासंघाच्यावतीने देण्यात येणारा तेजस्विनी पुरस्कार 2023 अर्जुन पुरस्कार विजेती हिमानी परब यांना समारंभपूर्वक देऊन गौरविण्यात आले. सिंधुदूर्ग कन्या असलेल्या हिमानी परब यांना यापूर्वी केंद्र शासनाच्या अर्जुन पुरस्कार आणि राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
अखिल भारतीय महिला मराठा महासंघाच्यावतीने विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या 10 महिलांचा तेजस्विनी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात हिमानी परब यांच्या मल्लखांब या खेळ प्रकारातील वाटचालीवर माहितीपट दाखविण्यात आला. तसेच, यावेळी हिमानी परब यांनी मनोगत व्यक्त केले.
पुरस्कार म्हणुन आकर्षक सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. याशिवाय, सौ. चंद्रकला कदम (चित्रकला), सौ. उत्कर्षा पाटिल (टेलीकम्युनीकेशन), सौ. फुलवा खामकर (नृत्य दिग्दर्शक), सौ. स्मिता विचारे (उद्योग), सौ. तृप्ती राणे (चार्टर्ड अकाउंटेन्ट), सौ. राजलक्ष्मी कदम (शासकीय अधिकारी), सौ. सुवर्णाताई निबांळकर (साहित्य), सौ. गिरिजा देसाई पाटिल (सहा. वनसंरक्षक अधिकारी), सौ. प्रगती विचारे (शासकीय अधिकारी), सौ. अनुपमा खानविलकर शितोळे (पत्रकारिता), सृष्टि तावडे (कला) यांनाही यावेळी तेजस्विनी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा