तोंडवली येथील अपघातानंतर आज घटनास्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी
नांदगाव:-
कणकवली तालुक्यातील देवगड निपाणी महामार्गावर तोंडवली पावणादेवी मंदिर नजीकच्या एका धोकादायक वळणावर काल सकाळी अकराच्या सुमारास चिरा वाहतूक करणारा ट्रक आणि कार यांच्या समोरासमोर अपघात झाला या अपघातात सुदैवाने कोणी जखमी झाले नाही पण कारचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते यावेळी संतप्त तोंडवली व वाघेरी परिसरातील नागरिकांनी काही काळ देवगड निपाणी या महामार्गावर कायमस्वरूपी ओरलोड केल्याची वाहतूक करणाऱ्या सर्व ट्रक धारकांना रोखून धरले होते.
या पाश्र्वभूमीवर आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली आहे.
यावेळी उप अभियंता के के प्रभू, कनिष्ठ अभियंता आर.एस.पवार त्याच प्रमाणे युवा सेना उपतालुकाप्रमुख आबू मेस्त्री, उपविभाग प्रमुख तात्या निकम ,अतुल सदडेकर उपस्थित होते.
या धोकादायक वळणावर वारंवार अपघात होतात येथे कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी. अशी मागणी उपस्थितांनी केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा