सिंधुदुर्ग Today न्यूज



नांदगाव ग्रामपंचायत सदस्या जैबा तोसिम नावलेकर यांच्या वतीने रमजान महिन्या निमित्त शीतपेय वाटप

नांदगाव प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीचे नांदगाव ग्रामपंचायत सदस्य जैबा तोसिम  नावलेकर यांच्या वतीने रमजान महिन्या निमित्त मुस्लिम बांधवांना शीतपेय (कोल्ड्रिंक्स) वाटप करण्यात आले. मागील काही वर्षापासून त्यांच्या पुढाकाराने बरेच कार्यक्रम करण्यात आले,  त्यामध्ये खजूर वाटप करणे, दूध वाटप करणे, लस्सी वाटप करणे असे कार्यक्रम घेण्यात आले होते. यावर्षी कडाक्याचा उन्हाळा असल्याने रमजान महिन्यात थोडाफार दिलासा मिळण्यासाठी त्यांनी शीतपेय वाटप केले.

     यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर,ग्रामपंचायत सदस्या रमिजान बटवाले,अलताज नावलेकर,मुबारक साटविलकर, इमाम नावलेकर हुसेन नावलेकर आदी महीला तसेच बच्चे कंपनी ही उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today