सिंधुदुर्ग Today न्यूज
नांदगाव पावाचीवाडी येथील महापुरुष क्रिडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने 2 मे पासून विविध कार्यक्रम.
4 मे रोजी भजनाचा जंगी सामना
बुवा भगवान लोकरे × बुवा प्रमोद हर्याण
कणकवली/प्रतिनिधी
नांदगाव पावाचीवाडी येथील महापुरुष क्रिडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने 2 ते 4 मे या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
महापुरुष क्रिडा व सांस्कृतिक मंडळ पावाचीवाडी नांदगाव च्या वतीने नूतन मंदिर उद्घाटन कार्यक्रम 2मे, 3मे व 4मे 2023 या दिवशी अनेक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.त्यात समाज उपयोगी उपक्रम ही राबविण्यात येत आहे.यामधे रक्तदान शिबीर मंगळवार दि. 2/5/23 रोजी सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत असणार आहे. रक्तदान करणा-या दात्याला आकर्षक भेट वस्तू दिली जाईल. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या कार्यक्रमात सहभागी होवून रक्तदान करावे असे आवाहन महापुरुष क्रिडा व सांस्कृतिक मंडळ पावाचीवाडीच्या वतीने करण्यात येत आहे.
कार्यक्रम पुढीलप्रमाणे असतील
बुधवार दि. 3 मे रोजी
सकाळी 8.30 वाजता होम-हवन ,
दुपारी 12 वाजता कलशारोहण हस्ते महाराज ,दुपारी महाप्रसाद
संध्याकाळी 7 ते 8.30 किर्तन -
रात्री 9.30 वाजता भजन
रात्री 10. 00 वाजता जिल्हा स्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा खुला गट , तिसरा दिवस गुरुवार दि. 4 मे 2023 रोजी
दुपारी 2.00 वाजता सत्यनारायण महापूजा.
संध्या. 4 वाजता हळदी कुंकू कार्यक्रम संध्याकाळी 5.00 महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम. रात्री 8.00 वाजता सत्कार कार्यक्रम ,महाप्रसाद,
रात्री 10.00 वाजता डबलबारी भजनाचा जंगी सामना
बुवा भगवान लोकरे ×प्रमोद हर्याण या सर्व कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा