सिंधुदुर्ग Today न्यूज

 


कलाकार जगला तरच कला टिकेल.

सिंधुदुर्ग Today न्यूज

मालवण तालुक्यातील, माळगांव गावात,(मधली वाडी)  दशावतार कलावंत कु.विराज भिवा माळगांवकर हा तरुण राहतो.मुळात कलेवर नितांत प्रेम करणारा हा कलाकार अत्यंत हलाखीच्या परिस्थितीशी सामना करत आहे.

त्याचे वडील वयोवृद्ध असल्याने घरीच असतात.

त्याचबरोबर त्याची आई अर्धांगवायूचा झटका आल्याने ती अंथरुणाला खिळून आहे.

हा उमदा तरुण दशावतार मध्ये काम करत आहे.त्याचबरोबर गणपती मुर्त्या बनवतो.याच दोन गोष्टींवर त्याचा उदरनिर्वाह अवलंबून आहे  पण त्याच्या एकट्याच्या कमाईत आईचे आजारपण, घर खर्च पुर्ण होत नाही.आर्थिक झळ सोसावी लागते आहे.आणि अशातच त्याच्यावर घररुपी संकट कोसळले आहे.मातीचे जुने घर असल्याने त्याच्या भींती कोसळायला आल्या आहेत.शासनाच्या घरकुल योजनेपासून वंचित आहे.त्यानी आपल्याला घर मिळावे म्हणून 

घरासाठी ग्रामपंचायत कडे विनवणीपुर्वक मागणी केली आहे.जवळपास तीन वर्षे होऊन गेली अजुन काही घर मिळाले नाही.दुर्देव म्हणावं लागेल.विराज आपली कला जोपासत आहे.या कलाकारांला लवकरात लवकरच घरकुल मिळावे.ही परमेश्वर चरणी प्रार्थना करत आहोत.आम्ही त्यासाठी प्रयत्न करत आहोत. कलाकार जगला तरच कला टिकेल.निदान कलाकाराचा विचार करून त्याला घर मिळाले पाहिजे होते.

आज अशा कलाकारांच्या पाठीशी आपण सर्व खंबीरपणे उभे राहिलो तर खूप काही बदल घडेल.नक्कीच सहकार्य हे केले पाहिजे.

श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था गराजलो रे गराजलो टीम नेहमीच जनजागृती करत असते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today