सिंधुदुर्ग today
कवयित्री सुगंधा देवरुखकर यांच्या 'मनश्चक्षू' कवितासंग्रहाचे १३ रोजी कणकवलीत प्रकाशन कवी अजय कांडर, प्रांताधिकारी जगदीश कातकर, मुख्याधिकारी गौरी पाटील, मधुकर मातोंडकर यांची उपस्थिती साहित्य संगीत संमेलन समितीतर्फे कार्यक्रमाचे आयोजन. कणकवली/प्रतिनिधी साहित्य संगीत संमेलन समिती, सिंधुदुर्ग आणि प्रभा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने कवयित्री सुगंधा बाळकृष्ण देवरूखकर लिखित 'मनश्चक्षू' या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा मंगळवार १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायं ४ वा.कणकवली मातोश्री मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. नामवंत कवी व सुप्रसिद्ध स्तंभ लेखक अजय कांडर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रांताधिकारी जगदीश कातकर आणि नगरपंचायत कणकवलीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील तर प्रमुख उपस्थिती म्हणून समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. कवयित्री सुगंधा देवरुखकर या दीर्घकाळ प्रशासनात कार्यरत होत्या. जिल्हा परिषदेच्या प्रशासन अधिकारी म्हणून त्या निवृत्त झाल्या. त्यानंतर त्यांनी आपल्या म...