पोस्ट्स

जुलै, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंधुदुर्ग today

इमेज
जलजीवन मिशन कार्यक्रम आढावा बैठक संपन्न. सिंधुदुर्गनगरी, दि.31 (प्रतिनिधी) : जलजीवन मिशन अंतर्गत अपुर्ण कामे व प्रलंबित देयकांच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे आढावा बैठक संपन्न झाली.  या बैठकीस उप अभियंता, उपविभागाचे क्षेत्रीय अभियंता,PMC टीम लीडर, PMCचे सर्व क्षेत्रीय अभियंता व TPI चे टीम लीडर, TPI चे क्षेत्रीय अभियंता व जिल्ह्यातील जल जीवन मिशन कामांचे मक्तेदार उपस्थित होते.  या सभेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कंत्राटदार यांच्या अडचणी समजून घेवून त्या दूर करण्याचे निर्देश सर्व कार्यालयीन यंत्रणाना दिले. जलजीवन मिशनची कामे पुर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणांनी पुर्तता करणे आवश्यक आहे. त्या तातडीने कराव्यात, ग्रामपंचायत स्तरावरील प्रलंबित प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात यावेत. जलजीवन मिशन योजनेचा शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर शासन निर्देशानूसार पैसे वितरीत करण्यात येतील आपल्या जिल्ह्यातील जनतेला पाणी मिळणे आवश्यक असल्याने सर्व यंत्रणानी कार्यवाही करावी. मक्तेदाराल...

सिंधुदुर्ग today

इमेज
भल्ली भल्ली भावय... कोळोशी येथे नागपंचमीच्या दिवशी खेळाची परंपरा मोठया उत्साहात.   नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)            दरवर्षी नागपंचमी दिवशी दुपारनंतर कोळोशी येथील पावणादेवी मंदिराच्या प्रांगणात रंगणारा खेळ बच्चे कंपनीला मज्जा मस्ती तर तरूण वर्गासाठी कौशल्य पणाला लावणारा भल्ली भल्ली भावय...कणकवली तालुक्यातील कोळोशी येथे नागपंचमीच्या दिवशी येथील खेळाची परंपरा मोठया उत्साहात साजरी झाली. चिखल,माती,पाणी  एकमेकांवर उडवून मज्जा लुटत या खेळात बच्छे कंपनीपासून वयोवृध्दांनीही   मनसोक्त माखून आनंद लुटला.हा आगळावेगळा खेळ पाहण्यासाठी स्थानिकांसह परीसरातील नागरीकांनी मोठी गर्दी  केली होती.                           "भल्ली....भल्ली....भावय....." कोकणातील सणाला विविध महत्त्व असते.प्रत्येक सणाची एक वेगवेगळी आख्यायिका सांगितली जाते.यातच सिंधुदुर्गातील सणचा एक वेगळाच थाट असतो.असाच श्रावण महिन्यात विशेषता नागपंचमी दिवशी होणारी कोळोशी येथील भल्ली भावय हा खेळ एक  वेगळाच अनुभव देऊ...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव ओटव फाटा ब्रिज वरील पथ दिवे डिसेंबर च्या अपघातानंतर बंदच. १५ ऑगस्ट पर्यंत सुरळीत न केल्यास स्वातंत्र्यदिनी करणार आंदोलन ;ग्रामस्थांचा इशारा कणकवली (ऋषिकेश मोरजकर)  कणकवली तालुक्यातील नांदगाव मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव ओटव फाटा ब्रिज खाली जवळपास २० ते २५ गावाचे प्राथमिक आरोग्य केंद्र असून ही या ब्रिज जवळील भागात स्ट्रीट लाईट डिसेंबर च्या अपघातानंतर बंदच असल्याने १५ ऑगस्ट पर्यंत सुरळीत न केल्यास १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनीच आंदोलन करण्याचा इशारा नांदगाव येथील ग्रामस्थांनी दिला आहे. या भागात हायवे प्राधिकरण व केसीसी कंपनी दुर्लक्ष करताना दिसत आहेत. येथे पथ दिवे सुरुवातीला लावण्यात आले होते. दरम्यान डिसेंबर २०२४ मध्ये शाळेतील सहल बस चा अपघात नांदगाव ओटव फाटा ब्रिज वर होत एस टी कठड्याला आदळून स्ट्रीट लाईट बंद पडल्या होत्या. त्यापासून संबंधित विभागाला वारंवार याबाबत सूचना करूनही त्याची दखल अद्यापही घेतलेली नाही यामुळे भागात यामुळे पूर्णतः अंधार पसरलेला आहे. अंधाराचा फायदा घेत या ब्रिजवर काही गैर कृत्य घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण या ब्रिज जवळील भागात पूर्णतः अंधकार पसर...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव भाजपा शक्ती केंद्र प्रमुख पदी मारुती मोरये यांची निवड. कणकवली प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील नांदगाव भारतीय जनता पक्षाचे शक्ती केंद्र प्रमुख पदी मारुती कृष्णा मोरये यांची निवड करण्यात आली आहे. भाजपचे ग्रामीण मंडल प्रमुख दिलिप तळेकर यांनी नियुक्तीचे पत्र आज दिले आहे.  यावेळी  ग्रामीण मंडल प्रमुख दिलीप तळेकर, सरचिटणीस पंढरी वायंगणकर, तालुका कार्यकारणी सदस्य प्रदीप हरमलकर ,तालुका कार्यकारणी सदस्य संतोष मिराशी, नांदगाव विभाग अध्यक्ष रघुनाथ लोके, नांदगाव बूथ प्रमुख हरिश्चंद्र उर्फ आबा बिडये, नांदगाव तिठा बूथ प्रमुख यासीर मास्के ,तोंडवली माजी उपसरपंच अशोक बोभाटे, तोंडवली बूथ अध्यक्ष प्रल्हाद कुडतरकर, तळेरे माजी सरपंच दिनेश मुद्रस तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव सावडाव केंद्रबलाचे केंद्रप्रमुख सद्गुरु कुबल यांचा सेवानिवृत्ती सोहळा संपन्न. कणकवली (ऋषिकेश मोरजकर)  कणकवली तालुक्यातील नांदगाव व सावडाव केंद्रबल गटातील केंद्रप्रमुख सद्गुरु कुबल हे सेवानिवृत्त होत असल्याने आज असलदे येथील गौरी मंगल कार्यालय येथे कुटुंबीयांमार्फत सेवानिवृत्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता.       या सोहळ्यासाठी बहुसंख्येने सद्गुरू कुबल प्रेमी उपस्थित होते. यात सामाजिक राजकीय शैक्षणिक सर्व क्षेत्रातील मंडळी आवर्जून सहभागी झाली होती. काहींनी सेवानिवृत्तीनंतर कुबल सरांनी राजकारणात यावे असा  संदेश दिला तर काहींनी राजकारण सोडून इतर कोणताही सामाजिक, शैक्षणिक, व्यवसायिक मार्ग निवडावा असे मत व्यक्त केले.          या भरगच्च कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी सभापती तुळशिदास रावराणे, दिलिप तळेकर, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती नागेश मोरये, बाळा जठार, नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर, पंचायत समिती माजी सदस्या सौ हर्षदा वाळके, साळीस्ते माजी सरपंच चंद्रकांत हर्याण, हेमंत परुळेकर,...

सिंधुदुर्ग today

इमेज
कुणकेश्वर शिवतीर्थावर पुन्हा मिळाला दैवी संकेत ! नागपंचमीला कुणकेश्वर येथे नागराज तर दुसऱ्याच दिवशी भैरव मंदिरात नागीणीचे दर्शन. कुणकेश्वर (ऋषिकेश मोरजकर) काल नागपंचमीच्या दिवशी नागराजांनी कुणकेश्वर येथे दर्शन दिल्यानंतर अवघ्या एका दिवसात पुन्हा एकदा सर्पदर्शनाची घटना घडली आहे. आज दुपारी सुमारे तीनच्या सुमारास कुणकेश्वर येथील भैरव मंदिराच्या सभा मंडपात नागिण आढळून आली. सदर घटना लक्षात येताच देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी तत्काळ प्रतिसाद देत स्थानिक सर्पमित्र पराडकर यांना संपर्क केला. पराडकर यांनी घटनास्थळी येत श्री देव भैरवाला तुझ्या स्थळात असलेली ही नागीण मी कोणतीही दुखापत न करता पकडून नैसर्गिक अधिवासात सोडणार आहे. असे साकडे घातले त्यानंतर ती नागीण सुरक्षितपणे पकडली व तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. विशेष म्हणजे सध्या भैरव मंदिराचा जिर्णोद्धार सुरू आहे, आणि याच कालावधीत अशी दुर्मिळ सर्पदर्शनाची घटना घडल्याने भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणावर कुतूहल आणि धार्मिक भावनांना उधाण आले आहे. नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या दिवशी अशी घटना घडल्याने ही एक दैवी संकेत म्हणून भाव...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथील आजच्या कला महोत्सवला कलाकारांचा उस्फुर्त प्रतिसाद.  किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट ने केले होते आयोजन.  कणकवली प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील किशोर मोरजकर  चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने नांदगाव आज पहिल्या श्रावण सोमवार निमित्त आयोजित केलेल्या कला महोत्सव ला कलाकारांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. भजनी बुवा, मूर्तिकार, नाट्य कलाकार यांनी सहभागी होत आपली कला सादर केली.        यावेळी या महोत्सवाला कलाकार मानधन समिती जिल्हाध्यक्ष बुवा संतोष कानडे यांची विशेष उपस्थिती लाभली.        यावेळी व्यासपीठावर नांदगाव सरपंच भाई मोरजकर, नांदगाव पंचायत समिती माजी सदस्या सौ हर्षदा वाळके, किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर, ट्रस्ट चे उपाध्यक्ष भाई मोरये , संतोष मिराशी बुवा, माजी उपसरपंच निरज मोरये, कासार्डे बिट अंमलदार चंद्रकांत झोरे, स्वप्निल जाधव, हनुमंत वाळके, रविंद्र तेली, ग्रामपंचायत सदस्य बुवा शंकर मोरये, बबन मोरये, मारुती मोरये, मंगेश मोरये, सदानंद बिडये, ज्येष्ठ बुवा आत्माराम घाडी, माजी तंटामुक्त सम...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथे होणार उद्या कला महोत्सव ; किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट चे आयोजन  सहभाग घेणाऱ्या सर्व कलाकारांना मिळणार प्रमाणपत्र. भजनी बुवा, मूर्तिकार , नाट्य कलाकार यांना सहभागी होता येणार. कणकवली प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील किशोर मोरजकर  चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने नांदगाव दशक्रोशी मर्यादित कला महोत्सव चे आयोजन उद्या सोमवार दिनांक 28 जुलै 2025 रोजी दुपारी 3 ते 6 या वेळेत कला महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.  यासाठी या कला महोत्सव मध्ये सर्वप्रथम भजनी बुवा कलाकार मूर्तिकार नाट्य कलाकार यांनी आपली नाव नोंदणी करावी जे कलाकार यात सहभागी होऊन आपली कला सादर करतील या सर्व कलाकारांना प्रमाणपत्र संस्थेच्या वतीने देण्यात येणार आहे. तरी नांदगाव असलदे , कोळोशी , आयनल,तोंडवली - बावशी, ओटव, माईन,सावडाव,बेळणे आदी गावातील सर्व कलाकार आणि यात सहभागी होऊ शकणार आहेत. तरी इच्छुक भजनी बुवा, मूर्तिकार, नाट्य कलाकार यांनी सहभागी व्हावे असे आवाहन आवाहन किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
भाजपा कणकवली तालुका मंडल अध्यक्षपदी दिलीप तळेकर : नवीन कार्यकारिणीची केली घोषणा तळेरे,  : (ऋषिकेश मोरजकर)  भारतीय जनता पार्टी कणकवली तालुका (ग्रामीण) मंडल कार्यकारिणीची घोषणा शनिवारी दुपारी तळेरे येथे करण्यात आली. यावेळी मंडल अध्यक्षपदी पुन्हा दिलीप तळेकर यांची निवड करण्यात आली. याची घोषणा संदीप साटम यांनी तळेरे येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.  तळेरे येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना संदीप साटम म्हणाले की, मागील 3 वर्षात लोकसभा आणि विभानसभा निवडणुकीत उत्तम निकाल आणि अपेक्षित काम झालेले आहे. त्याबद्दल अभिनंदन करताना शत प्रतिशत भाजपकडे वाटचाल करून आपल्या या नवीन कार्यकारिणीत प्रत्येकाला सामावून घेण्याचा आणि जबाबदारी वाटून देण्याचा प्रयत्न केला आहे. तर याव्यतिरिक्त अनेकांना अजून वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपविण्यात येतील.  यावेळी खारेपाटण, कासार्डे, फोंडा, कलमठ या विभागाची तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. इतर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : राजेश (सोनू) सावंत, राजेश जाधव, नरेश गुरव (उपाध्यक्ष) स्वरूपा विखाळे, विनिता बुचडे, तृप्ती माळवदे (महिला उपाध्यक्ष)...

सिंधुदुर्ग today

इमेज
  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मनोज रावराणे यांच्यातर्फे  कोळोशी -हडपिड येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटप. नांदगाव/वार्ताहर         महाराष्टाचे लाडके मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली माजी सभापती मनोज रावराणे यांच्यातर्फे कोळोशी -हडपीड येथील विद्यार्थ्यांना कणकवली तालुका भाजप सरचिटणीस पंढरी वायंगणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वह्या वाटप करण्यात आले.          जि.प.शाळा कोळोशी वरची वाडी,जि.प.शाळा कोळोशी हडपिड व माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी -हडपिडच्या विद्याथ्यांना कणकवली माजी सभापती मनोज रावराणे यांच्यावतीने वह्या वाटप करण्यात आले.यावेळी कणकवली तालुका भाजप सरचिटणीस पंढरी वायंगणकर,कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर,शाळा समिती अध्यक्ष कीशोर राणे, मुख्याध्यापिका सौ.अश्विनी गर्जे, मुख्याध्यापिका सौ.तेली, मुख्याध्यापिका सौ.तांबे,माजी सरपंच सुशील इंदप, श्रीमती सुचिता पोकळे, पत्रकार उत्तम सावंत,मंगेश इंदप, सदानंद पावसकर, शामराव परब,सौ.मुंडे आदी मान्यवर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्...

सिंधुदुर्ग today

इमेज
कणकवली शहरात पोलिसांची अचानक नाकाबंदी. नाका बंदी मुळे अनेकांची उडाली तारांबळ. कणकवली (ऋषिकेश मोरजकर)  कणकवली तालुक्यासह शहरांमध्ये होणाऱ्या घरफोड्या, अवैध प्रवासी वाहतूक ,अवैद्य होणारी  गोवाबनावटीची   दारू  वाहतूक अशा घटनांना आळा घालण्यासाठी  कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली गांगो मंदिर येथे पोलिसांनी शनिवारी सायंकाळी सात वाजता नाकाबंदी केली केलेली पाहायला मिळाली. यावेळी पीएसआय नानचे,  पोलीस हवालदार विनोद चव्हाण,  महिला पोलीस विनया सावंत, पोलीस नाईक सुशांत जाधव , उपस्थित होते यावेळी चारचाकी व अवजड वाहनांची कसून तपासणी करण्यात आल्याचे पाहायला मिळाले पण या नाकामध्ये काही विना लायसनधारक व गाडीच्या कागदपत्रे नसणाऱ्या वाहनचालकांची तारांबळ उडाली पाहायला मिळाली

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव रेल्वे स्टेशन समस्यांबाबत संघर्ष समितीने घेतली अधिकाऱ्यांची भेट. विविध समस्यांचा वाचला पाढा. नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) कणकवली तालुक्यातील नांदगाव रेल्वे स्टेशन म्हणजे काय कणकवली तालुक्यातील महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे या रेल्वे टेशन मध्ये देवगड तालुक्यापासून ते फोंडा नांदगाव दशक्रोशीतील तसेच कासार्डे प्रवासी या ठिकाणी येत असतात अशावेळी या रेल्वे स्टेशन मध्ये होत असलेल्या समस्या बाबत आज येथील संघर्ष समिती यांनी नांदगाव व कणकवली या ठिकाणी आलेल्या रेल्वे अधिकारी यांची भेट घेतली. यामध्ये रेल्वे स्टेशन इमारत गळती, रंगरंगोटी प्लॅटफॉर्मवर निवारा शेड ,गणेश चतुर्थी पूर्वी मांडवी एक्स्प्रेस थांबा, रेल्वे कॅन्टीन,CCTV कॅमेरा बसविणे, रेल्वे स्थानक दिशादर्शक फलक लावण्यात यावे अशा विविध समस्यांचा पाढा वाचण्यात आला. लवकरच समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न होतील अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.      यावेळी विजय सामंत,मधुकर मातोंडकर ,जी. पी .प्रकाश,  स्टेशन मास्तर कांबळे, आदी अधिकारी वर्ग उपस्थित होते.     पियाळी उपसरपंच संजय ढवण, संघर्ष समिती अध्यक्ष वाघेरी माजी सरपंच संतो...

सिंधुदुर्ग today

इमेज
श्रीदेव दत्त मंदिर ट्रस्ट तोंडवली कुडतरकर वाडी यांच्या वतीने गुरु पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात. समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार. कणकवली प्रतिनिधी  श्रीदेव दत्त मंदिर ट्रस्ट तोंडवली कुडतरकर वाडी यांच्या वतीने गुरु पौर्णिमेनिमित्त यावर्षी पासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामध्ये किर्तन, भजन, दोन्ही वेळ महाप्रसाद तसेच समाजात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार यावेळी करण्यात आला.यामध्ये शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आग्रे, मंगेश नाडकर्णी, तोंडवली बावशी सरपंच मनाली गुरव, ग्रामपंचायत अधिकारी एकनाथ चव्हाण, कवी अजय कांडर, पत्रकार ऋषिकेश मोरजकर, तोंडवली बावशी तलाठी ,तोंडवली पोलीस पाटील विजय मोरये, पावणादेवी ट्रस्ट अध्यक्ष मुंबई समिती अतुल सदडेकर, माजी उपसरपंच अशोक बोभाटे , तोंडवली शाळा नंबर 1 मुख्याध्यापक जाधव आदींचा सत्कार करण्यात आला.          यावेळी मंडळाचे अध्यक्ष दिनकर कुडतरकर ,उपाध्यक्ष -  प्रकाश नारकर, सचिव - प्रकाश कुडतरकर,सह सचिव -  प्रल्हाद कुडतरकर, खजिनदार -  दत...

सिंधुदुर्ग today

इमेज
रोटरी क्लब कणकवली तर्फे आयडियल स्टडी ॲप चे मोफत वितरण व करियर गायडन्स चा उपक्रम नांदगाव येथील सरस्वती हायस्कूल येथे आज उपक्रम  नांदगाव प्रतिनिधी      आज शनिवार दिनांक २६ जुलै २०२५ रोजी रोटरी क्लब कणकवली सेंट्रल आयोजित सरस्वती हायस्कूल नांदगाव चे १० वी तील विध्यार्थ्याना  आयडीयल स्टडी अँप चे मोफत वितरण करण्यात येणार आहे. तसेच त्यावेळी पुढील विषयावर शैक्षणिक मार्गदर्शन म्हणून करिअर गाईडन्स अंतर्गत सरस्वती हायस्कूल नांदगाव येथे सकाळी ९:३० वाजता खालील विषयांवर मार्गदर्शन होणार आहे तरी सर्वांनी उपस्थित रहावे, ही विनंती १)विषय - इंजिनिअरिंग च्या शिक्षणातील नवीन संधी आणि त्याची पूर्व तयारी. मार्गदर्शक-प्रोफेसर प्राजक्ता संतोष राणे, एस एस पी एम कॉलेज.२) विषय - कायद्याच्या शिक्षणातील विविध संधी व  त्याची पूर्वतयारी - मार्गदर्शक- अँड. दीपक आत्माराम अंधारी, जेष्ठ विधिज्ञ्, कणकवली हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. 

सिंधुदुर्ग today

इमेज
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता. अँड उमेश सावंत यांनी पाहिले काम.  कणकवली/प्रतिनिधी अल्पवयीन मुलीचा चोरून पाठलाग करून तीची वाट अडवून धमकी दिली. तसेच तीचे अश्लिल फोटो काढत विनयभंग केल्याप्रकरणी सचिन उर्फ पपल्या महादेव चाळके रा. बेळणेखुर्द याची प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एच. बी. गायकवाड यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले. आरोपीने २०१९ मध्ये संबंधीत अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून तीचा चोरून पाठलाग केला. तसेच तीची वाट अडवून तीच्या बडिल व भावाला मारून टाकेन अशी वेळोवेळी धमकी दिली. तीच्या मोबाईलवर अनेकदा अश्लिल मेसेज पाठविले. तसेच तीला एकांतात गाठून अश्लिल फोटो काढले व विनयभंग केला. याबाबत दाखल तक्रारीनुसार भादवि कलम ३५४, ३५४ ड, ३४१, ५०६ बालकांचे अत्याचारापासून संरक्षण कायदा ८, १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनावणीत सरकारपक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षीतील तफावतीमुळे न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

सिंधुदुर्ग today

इमेज
कासार्डे  उत्तर गावठण येथील ब्रिज वरील रस्ता अतिवृष्टीमुळे कोसळला. येण्याजाण्याचा एकमेव मार्ग बंद. कणकवली (ऋषिकेश मोरजकर)  सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यामध्ये गेले दोन दिवस सतत जोरदार अतिवृष्टी सुरू आहे . या अतिवृष्टीमुळे कणकवली तालुक्यातील कासार्डे उत्तर गावठण येथील पुलाजवळीलच रस्ता आज दुपारी १ च्या सुमारास कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक तसेच येण्याजाण्याचा मार्ग ठप्प झाला आहे . यामुळे उत्तर गावठण येथे असलेल्या सातशे लोकांचा दळणवळणांचा मार्ग बंद झाल्याने गैरसोय झाली आहे.        उत्तर गावठाण मधील जनतेला याच ब्रिजवरून ग्रामपंचायत म्हणा इतर इतरत्र ठिकाणी ये जा करण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. संबंधित पुलावरील रस्ता कोसळल्याची माहिती समजतात कासार्डे गावातील सरपंच निशा नकाशे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई , कासार्डे तलाठी , ग्रामविका अधिकारी तसेच गावातील इतर ग्रामस्थांनी त्या रस्त्याकडे धाव घेतली. येण्या जाण्याचा मार्ग बंद झाल्याने या मार्गावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी उत्तर गावठण मधून केली जात आहे .

सिंधुदुर्ग today

इमेज
आनंद लुटा पण स्वतःची काळजी घ्या -  पालकमंत्री नितेश राणे यांचे पर्यटकांना आवाहन. काचेच्या पुलामुळे जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळेल. नापणे धबधब्यावर उभारला राज्यातील पहिला काचेचा पुल.  धबधबा सुशोभीकरण व काचेच्या पुलाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले उद्घाटन‌. जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांची प्रमुख उपस्थिती. वैभववाडी (ऋषिकेश मोरजकर)      नापणे धबधब्यावर राज्यातील पहिला काचेचा पूल उभारण्यात आला आहे. या पुलामुळे निश्चित सिंधुदुर्गच्या पर्यटनाला चालना मिळेल. आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून नापणे धबधबा नावारुपाला येईल. पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी धबधब्यावरील काचेच्या पुलाचा आनंद लुटावा पण स्वतःची काळजी घ्यावी, शासनाच्या नियमांचे पालन करा असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले. बारमाही वाहणाऱ्या नापणे धबधब्यावरती सिंधूरत्न योजनेतून उभारण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पत्...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथे होणार कला महोत्सव ; किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट चे आयोजन  सहभाग घेणाऱ्या सर्व कलाकारांना मिळणार प्रमाणपत्र. भजनी बुवा, मूर्तिकार , नाट्य कलाकार यांना सहभागी होता येणार. कणकवली प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील किशोर मोरजकर  चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने नांदगाव दशक्रोशी मर्यादित कला महोत्सव चे आयोजन करण्यात येत आहे यासाठी या कला महोत्सव मध्ये सर्वप्रथम भजनी बुवा कलाकार मूर्तिकार नाट्य कलाकार यांनी आपली नाव नोंदणी करावी जे कलाकार यात सहभागी होऊन आपली कला सादर करतील या सर्व कलाकारांना प्रमाणपत्र संस्थेच्या वतीने देण्यात येणार आहे .तरी नांदगाव असलदे , कोळोशी , आयनल,तोंडवली - बावशी, ओटव, माईन,सावडाव,बेळणे आदी गावातील सर्व कलाकार आणि यात सहभागी होऊ शकणार आहेत. तरी इच्छुक भजनी बुवा, मूर्तिकार, नाट्य कलाकार यांनी सहभागी होण्यासाठी सर्व प्रथम 25 जुलै पर्यंतच नाव नोंदणी 9096564410 या मोबाईल नंबर वर करावी असे आवाहन किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
रोजगार मेळाव्याचे पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य. कणकवली : प्रतिनिधी    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आणि कणकवली महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंदाचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे, जिल्हा कौशल्य विभागाचे आमिण तडवी, जिल्हा व्यवसाय शिक्षण विभागाचे अनिल मोहरे, शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, प्राचार्य युवराज महालिंगे, प्रा. हरिभाऊ भिसे, कणकवली ज्यु. कॉलेजचे पर्यवेक्षक श्री. माने आदी मान्यवर उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत २६ जुलै रोजी अनुसूचित जातीचा "समाज संवाद आणि समस्या निवारण मेळावा" संविधानिक हितकरिणी महासंघाकडून समाजबांधवांना उपस्थितीत राहण्याचे आवाहन. सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा नियोजन कक्षात होणार मेळावा. अनुसूचित समाजबांधवांच्या प्रश्नाची आता होणार सोडवणूक. सिंधुदुर्ग ऋषिकेश मोरजकर : संविधानिक हितकरिणी महासंघाच्यावतीने येत्या शनिवार, २६ जुलै रोजी दुपारी २ ते ६ या वेळेत महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत 'समाज संवाद आणि समस्या निवारण मेळाव्या'चे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा नियोजन कक्षात शासन आणि प्रशासनाच्या प्रतिनिधींसमवेत हा मेळावा होणार आहे. समाजबांधवांनी आपल्या समस्या लेखी स्वरूपात घेऊन याव्यात, असे आवाहन जिल्हाध्यक्ष महेश परूळेकर यांनी केले आहे.       अनुसूचित जातीतील लोकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. बौद्ध दीक्षित आणि बौद्ध दीक्षा घेतली नसलेल्या समाजाचे सुद्धा प्रश्न प्रशासनाकडून सुटत नाहीत. त्यामुळे  पालकमंत्री निते...

सिंधुदुर्ग today

इमेज
जिल्हा भाजपा आणि भजनी कलाकार संस्थेच्या वतीने जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन. लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भजन सदन उभारणार : मंत्री नितेश राणे.  सिंधुदुर्ग (ऋषिकेश मोरजकर) सिंधुदुर्ग जिल्हा भाजप आणि भजनी कलाकार संस्थेच्या वतीने कुडाळ येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे उद्घाटन मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आज संपन्न झाले.          यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भजनी कलाकार संस्थेचे जिल्हाध्यक्ष बुवा संतोष कानडे, सुरेश सावंत , कुडाळ तालुका अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर ,ज्येष्ठ बुवा श्री. परब, मोहन सावंत, ज्येष्ठ बुवा श्री प्रकाश पारकर उपस्थित होते.      यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी भजनी बुवांना मार्गदर्शन करताना सांगितले की,  लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भजन सदन उभे केले जाईल महायुती सरकार हे भजनी कलावंतांच्या खंबीरपणे पाठी...

सिंधुदुर्ग today

इमेज
असलदे येथील शिवशंकर पार्वती कृषी पर्यटन रिसॉर्टला विनोद तावडे यांनी सपत्नीक दिली भेट. कणकवली  (ऋषिकेश मोरजकर)  भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सपत्नीक असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर, तुकाराम उर्फ बाबू रासम ,गोविंद तावडे यांच्या शिवशंकर पार्वती कृषी पर्यटन रिसॉर्टला आज सदीच्छा भेट दिली. यावेळी त्यांचा पंढरी वायंगणकर यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.       यापूर्वी ४ हजार काजूंची लागवड केलेल्या या बागेत राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी ही या बागेला भेट दिली. ७ नंबर ओल्या काजू गर साठी प्रसिद्ध असलेल्या बागेमध्ये पाहणी केली. हे ओले काजू गर बाहेर इतरत्र जात असतात.      यावेळी जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, राजू राऊळ , बंड्या सावंत , विठ्ठल खरात , शामराव परब ,पप्पी वायंगणकर , पांडुरंग मर्तल, निसार पाटणकर, श्री आठले, अरुण गावकर आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
प्रणाली मानेंसह तीघांनाही अटकपुर्व जामिन मंजूर  प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणी न्यायालयाचे आदेश अँड उमेश सावंत , अँड संग्राम देसाई यांनी पाहिले काम कणकवली/प्रतिनिधी सावंतवाडी माठेवाडा येथील विवाहिता सौ. प्रिया पराग चव्हाण यांना आत्महत्येा प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या देवगडच्या माजी नगराध्यक्षा प्रणाली माने, मुलगा आर्य माने व पती मिलींद माने यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी प्रत्येकी २५ हजार रुपयांचा सशर्थ अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. संशयितांपैकी प्रणाली व आर्य माने यांच्यावतीने अॅड. उमेश सावंत तर मिलींद माने यांच्यावतीने अॅङ संग्राम देसाई यांनी काम पाहिले. ३ जुलैच्या रात्री प्रणाली माने यांच्या आईच्या घरी झालेल्या कुटुंबाच्या बैठकीत सौ. प्रिया हिला आपल्या पतीबरोबर असलेल्या आर्थिक व्यवहारांबाबत विचारणा करून तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आला. त्यामुळे त्या मध्यरात्री सी. प्रिया यांनी त्यांच्या राहत्या घराच्या बेडरुममध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. याबाबत ६ जुलै रोजी त्यांचे वडील विलास तावडे (रा. कलंबिस्त) यांनी दिलेल्या फिर्यादी...

सिंधुदुर्ग today

इमेज
वेंगुर्ले येथील स्थानिक उबाठा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आंदोलनाकडे फिरवली पाठ. माजी आम. परशुराम उपरकर यांनी ही आंदोलनात सहभागी होण्याचे टाळले. उबाठा मधील दोन गट वेंगुर्ले येथे  दिसून आले स्पष्ट. वेंगुर्ले : प्रतिनिधी उबाठा सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी आज दाभोली येथील प्रकारणावरून वेंगुर्ले येथे जाहीर केलेल्या आंदोलनाचा फज्जा उडाला. स्थानिक उबाठा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरविल्याने आम. नाईक यांना अधिकाऱ्यांशी चर्चा करून मागे फिरावे लागले. त्यांच्या सोबत असणारे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी ही या आंदोलनात सहभागी होण्याचे टाळले. तर दुसऱ्या बाजूला उबाठा सेने तर्फे शहरात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला कार्यक्रम दणक्यात केला. त्यामुळे उबाठा मधील दोन गट एक पुन्हा एकदा स्पष्ट दिसून आले. दाभोली येथील जमीन विक्री प्रकरणावरून स्थानिक जमीन मालकांबरोबर आपण आहोत असे उबाठा सेनेचे माजी आमदार वैभव नाईक आणि माजी आम. परशुराम उपरकर यांनी जाहीर केले होते. काही दिवसांपूर्वी वेंगुर्ले पोलिस ठाण्यात येऊन संबंधितांवर कारवाई करावी अशी दोघांन...

सिंधुदुर्ग today

इमेज
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष - गरजूंसाठी दिलासा देणारी शासनाची संवेदनशील योजना सिंधुदुर्ग प्रतिनिधी    आर्थिक दृष्टया गरजू रुग्णांना तातडीच्या व अत्यावश्यक आजारांवर उपचार मिळणेकरीता मा. देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या संकल्पनेतून आणि राज्यस्तरीय कक्षप्रमुख श्री रामेश्वर नाईक यांच्या देखरेखीत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष जिल्हास्तरावर सुरु करण्यात आलेला आहे.  समाजातील गरीब व गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, धर्मदाय रुग्णालयांतर्गत मोफत उपचार मिळवून देणे, महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत योजनेसह इतर योजनांची माहिती व सुविधा रुग्णांना मिळवून देणे, तसेच योजनेच्या बाहेर असलेल्या रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत मदत पुरविणे हे या कक्षाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.सदर कक्षाद्वारे जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी या निधीतून अर्थसहाय्य पुरविले जाते.     तसेच, पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात, मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना “मुख्यमंत्...

सिंधुदुर्ग today

इमेज
यशस्वी करिअरसाठी  योग्य निर्णयक्षमता महत्त्वाची - सौ-वंदना नागरगोजे कासार्डे माध्य- व उच्च माध्यमिक विद्यालयात व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रमात प्रतिपादन  :विठ्ठल रखुमाई मंदिर समिती ओझरम तिर्थवाडीचा स्तुत्य उपक्रम       तळेरे - प्रतिनिधी      यशस्वी करिअरसाठी जिद्द,चिकाटी,अपार कष्ट करण्याची तयारी आणि योग्य निर्णयक्षमता महत्त्वाची भूमिका बजावतात असे प्रतिपादन व्यवसाय सायकॉलॉजिस्ट सौ.वंदना नागरगोजे यांनी कासार्डे माध्यमिक विद्यालयात आयोजित व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रमात केले.     त्या विठ्ठल रूखमाई मंदिर समिती ओझरम- तीर्थवाडी यांच्यावतीने आयोजित "व्यवसाय मार्गदर्शन" कार्यक्रमात कासार्डे माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होत्या.       याप्रसंगी व्यासपीठावर कासार्डे विकास मंडळ मुंबईचे स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे,प्राचार्या सौ.बी.बी. बिसुरे,श्री.नागरगोजे,पर्यवेक्षक एस.व्ही राणे,विठ्ठल रूखमाई मंदिर समिती ओझरम तिर्थवाडीचे उपाध्यक्ष अशोक राणे,बाबू राणे,जितेंद्र राणे,ओझरम जि.प.पुर...

सिंधुदुर्ग today

इमेज
वाढवण बंदरसाठी आवश्यक मनुष्यबळ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून निर्माण करणार. वेंगुर्ला,मालवण व देवगड या किनारपट्टी आयटीआय मध्ये प्राधान्य देणार -  पालकमंत्री नितेश राणे. सिंधुदुर्ग (ऋषिकेश मोरजकर)  वाढवण बंदराच्या विकासामुळे संपूर्ण कोकणासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या वाढवण बंदरासाठी आवश्यक असणारा कुशल कर्मचारी तयार करण्यासाठी जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रानी तयार करावा यासाठी प्रयत्न असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सर्व प्राचार्यांची व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रमुख अनिल मोहेर यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गनगरी येथे  बैठक झाली. सागरी किनारपट्टीवर असलेल्या वेंगुर्ला मालवण व देवगड या तीन औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे प्रस्ताव तयार करावेत. व त्या ठिकाणी हे अभ्यासक्रम शिकवण्यासाठी आवश्यक कर्मचारी मनुष्यबळ व इमारतींची स्थिती याबाबत अहवाल द्यावा असे निर्देश पालकमंत्री नितेश राणेंनी दिले आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी अनिल पाटील, जि. प...

सिंधुदुर्ग today

इमेज
जिल्ह्यातील कोणत्याही बस फेऱ्या रद्द करू नका. गणेशोत्सव काळात येणाऱ्या गणेश भक्तांना सुरळीत वाहतूक सेवा द्या. - पालकमंत्री नितेश राणे. सिंधुनगरी  ऋषिकेश मोरजकर  गणेशोत्सव तोंडावर आला आहे, सिंधुदुर्गात दळणवळणाचे प्रमुख साधन एस टी वाहतुकीचे आहे. कोकणातील गणेशोत्सवासाठी जवळपास पाच हजार एसटी फेऱ्या होणार आहेत. त्यामधून येणाऱ्या गणेश भक्त प्रवाशांना चांगली सेवा द्या. जिल्ह्यातील कोणत्याही शालेय व अन्य प्रवासी फेऱ्या रद्द होणार नाही याची दक्षता घ्या. असे आदेश पालकमंत्री नितेश राणे यांनी बस वाहतूक नियोजन बैठकीत दिले.        या वेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, मनीष दळवी विभाग नियंत्रण प्रज्ञेश बोरसे, यंत्र अभियंता सुजित डोंगरे, विभागीय वाहतूक अधिकारी विक्रम देशमुख, विभागीय वाहतूक अधीक्षक निलेश लाड अन्य तालुका वाहक नियंत्रण उपस्थित होते. जिल्ह्यात मिनी बसचा प्रभावी वापर करा. व या मिनी बसचा ग्रामीण व शहरी भागातील जनतेला चांगला वापर होईल असे नियोजन करा  अशा सूचनाही मंत्री नितेश राणे यांनी केल्या.

सिंधुदुर्ग today

इमेज
रस्त्यावरील खड्डे भरण्याची कामे तत्काळ करा. झालेल्या कामांचा निधी मुदतीत देणार. खड्डे व झाडी मुक्त करा व सुस्थितीत रस्ते ठेवा. पालकमंत्री नितेश राणेंचा आदेश  सिंधुनगरी (ऋषिकेश मोरजकर) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वंच ठिकाणच्या रस्त्यांना खड्डे पडले असून बोंबाबोब आहे. जिल्हा परिषद, राज्य व राष्ट्रीय दर्जाच्या सर्व रस्त्यांची डाकडुजी करा. प्राधान्याने खड्डे बुजवा. ६३ कि.मी. सार्वजनिक बांधकाम कडे असणारे रस्ते व १८८ कि.मी. इतर जिल्हा मार्गावर खड्डे पडले आहेत. हे खड्डे भरण्याचे काम सुरू करा. या झालेल्या सर्व कामाचे पैसे देण्याची जबाबदारी माझी आहे. हे पैसे मुदतीत मिळतील. पैसे मिळतील हा ठेकेदार एजन्सीना विश्वास द्या. खड्डे भरा व दर्जेदार कामे करा असे आदेश मंत्री नितेश राणे यांनी या आढावा बैठकीत दिले.          जिल्ह्यातील रस्त्यावर खड्डे हा गंभीर विषय आहे. याबाबत सोमवारी मंत्री नितेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम अशा सर्व यंत्रणांची आढावा बैठक घेतली. यावेळी         यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रव...

सिंधुदुर्ग today

इमेज
विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई तातडीने द्यावी अन्यथा  कंपन्यांवर करवाई :   पालकमंत्री नितेश राणेंचे निर्देश  सिंधुनगरी (ऋषिकेश मोरजकर)  विमा कंपनी शेतकऱ्यावर उपकार करीत नाही, नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना वेळेत मिळाली नाही तर या विमा कंपन्यांवर कारवाई तर त्या विमा कंपन्या शासनाकडून बदलून घेऊ अशी तंबी राज्याचे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. जिल्ह्यात ४२२८१ शेतकरी पीकविमा धारक आहेत. हवामानाची आकडेवारी मिळवणं ही जबाबदारी विमा कंपनीची आहे. यात कारणे नको नुकसान भरपाई तातडीने द्या असे निर्देश त्यांनी दिले.           जिल्ह्यातील पिक विमा नुकसान भरपाई तातडीने मिळण्याबाबत  पालक मंत्री नितेश राणे यांनी ही आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा कृषी अधीक्षक श्रीमती नाईकनवरे, कृषी विद्यापीठ अधिकारी, सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष  मनीष दळवी, अशोक सावंत जिल्हा बँक सी ई ओ प्रमोद गावडे. आदी उपस्थित होते.      पिक विम्यात सुपारी पिकाचा समावेश नाही. त्य...

सिंधुदुर्ग today

इमेज
कवयित्री विद्या पाटील यांना गोलपिठा पुरस्कार जाहीर. सिंधुदुर्ग सम्यक संबोधी साहित्य संस्थतर्फे काव्य पुरस्कार योजनेचे आयोजन. संस्था अध्यक्ष किशोर कदम, सचिव सूर्यकांत साळुंखे यांची माहिती. कणकवली/प्रतिनिधी सम्यक संबोधी साहित्य संस्था सिंधुदुर्गतर्फे मराठी साहित्यातील नव्या कवीना प्रेरणा देण्यासाठी कविवर्य नामदेव ढसाळ स्मृती प्रित्यर्थ ' गोलपिठा ' या काव्य पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार योजनेला महाराष्ट्रातून 85 कवींनी आपल्या प्रत्येकी पाच कविता पाठविल्या होत्या. यामधून कवयित्री विद्या पाटील यांच्या कवितांची ' गोलपिठा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून या काव्य पुरस्काराचे परीक्षक म्हणून मराठीतील ज्येष्ठ कवी आणि सामाजिक कार्यकर्ते सायमन मार्टिन (वसई ) यांनी काम पाहिले. रोख दोन हजार रुपये / स्मृतीचिन्ह, शाल आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.      सिंधुदुर्ग सम्यक संबोधी साहित्य संस्थेतर्फे विविध साहित्यिक पुरस्कार आयोजित केले जातात.त्याचबरोबर महाराष्ट्रातील कथा कादंबरी कविता समीक्षा वैचारिक लेखन करणाऱ्या गुणवंत लेखक कवीना प्रेरणा देण्यासाठी विविध पुरस्का...

सिंधुदुर्ग today

इमेज
कुडाळ तालुका भंडारी महासंघाच्या विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात.  पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन. कुडाळ प्रतिनिधी  कुडाळ तालुका भंडारी महासंघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा  गुणगौरव सोहळा आज उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते करण्यात आले.        विद्यार्थ्यांचा गुणगौरव पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते करण्यात आला.         यावेळी भंडारी समाज महासंघाचे पदाधिकारी नविनचंद्र बांदिवडेकर, हेमंत करंगुटकर, अतुल बंगे, प्रभाकर सावंत, मामा माडये, श्री. मायनाक, एकनाथ टेमकर, समील जळवी, रुपेश पावसकर,  नागेश शिंदे, श्रेया गवंडे, ज्योती जळवी, आफ़्रिन करोल, निलेश परब, वृंदा कांबळी, संजय वेंगुर्लेकर, राजू  गवंडे आदी बहुसंख्येने भंडारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) जयप्रकाश परब यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट. कणकवली प्रतिनिधी  जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) म्हणून नुकत्याच रुजू झालेल्या  जयप्रकाश अनंत परब यांनी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली. श्री. परब हे कणकवली तालुक्यातील कासार्डे येथील मूळ रहिवाशी आहेत. त्यांनी यापूर्वी देवगड व वैभववाडी येथे गटविकास अधिकारी म्हणून काम पाहिले होते. त्यांच्यासोबत कणकवली गटविकास अधिकारी अरुण चव्हाण उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
पालकमंत्री नितेश राणे रविवार २० जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर. ओम गणेश निवासस्थानी दुपारी १२ ते ४ या वेळेत जनतेच्या घेणार गाठीभेटी. कणकवली /प्रतिनिधी   मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे रविवारी पालकमंत्री नितेश राणे रविवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर मुंबई विमानतळाकडे प्रयाण, सकाळी ०७.४५ वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे आगमन व राखीव, सकाळी ०८.१५ वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने गोव्याकडे प्रयाण, सकाळी ०९.३० वा. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण, सकाळी १०.३० वा. कुडाळा तालुका भंडारी समाज मेळावा व विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यास उपस्थिती, दुपारी १२.०० ते ०४.०० पर्यंत, ओम गणेश निवासस्थान येथे जनतेच्या गाठीभेटी, सायं ०५.३० वा. कोकणसाद या दैनिकाचा ३६ वा. वर्धापन दिन व विशेषांक प्रकाशन सोहळयास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती, स्थळ हॉटेल अराध्या मुंबई-गोवा महामार्ग, नेमळे, सावंतवाडी असा दौरा राहणार आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
दत्त मूर्तीची सत्यता तपासणीचे पुरातत्व  खात्याचे आदेश. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन ने केली होती मागणी. कणकवली प्रतिनिधी          जानवली कृष्णनगरी कणकवली येथील रहिवाशी मधुकर रामचंद्र मोहिते यांच्या मागील पडवीत खोदकाम करताना डिसेंबर 2018 रोजी साडेचार फुटावर  सदरची श्री दत्तगुरुंजी मूर्ती सापडल्याचे ओमकार  मोहिते यांनी मीडियासमोर येऊन सांगितले होते .त्यानंतर या मूर्तीबाबत सोशल मीडिया वरून अनेकांनी त्याची अलौकिक, चमत्कारिक आणि दैवी प्रसिद्ध केली होती. की सतत चार महिने त्या जागी पाणी येत होते .ओलसरपणा असल्याने पाणी कोठून येते याची शहानिशा करण्यासाठी खोदाई केली असता साडेचार फूटावर  सदरची मूर्ती सापडली . मूर्ती बाहेर काढताच पाणी यायचे बंद झाले . सदरची मूर्ती  पूर्ण सोन्याची असून एका हाताने  उचलल्यास जड लागते मात्र वजन काट्यावर ठेवली असता त्याचे वजन शून्य दाखविते . अशा या चमत्कारिक , अलौकिक आणि दैवी  प्रसिद्धीमुळे अनेक भाविकानी येऊन त्या मूर्तीबाबतचे माहिती कुटुंबियाकडून घेऊन पुन्हा अनेकानी या दत्तमूर्तीचा देवस्थानचे व्हिडिओ बनविले...

सिंधुदुर्ग today

इमेज
'मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना' संदर्भातील संदेश पुर्णपणे खोटा. अशी कोणतीही योजना नाही ; फसव्या अफवांवर विश्वासू ठेवू नये. सिंधुदुर्गनगरी  (प्रतिनिधी) :- 'मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना' या नावाने सोशल मीडियावर प्रसारित  होत असलेला संदेश पूर्णपणे खोटा असून, महिला व बाल विकास विभागाकडून अशी कोणतीही योजना राबविण्यात येत नाही, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अशा फसव्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे. 'मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना' अशी योजना असल्याचे भासवून समाजमाध्यमांद्वारे काही संदेश प्रसारित होत आहेत. असे वृत्त केवळ अफवा असून, नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये व फसवणुकीला बळी पडू नये. या प्रकारच्या फसव्या संदेशांमध्ये दि. 1 मार्च 2020 नंतर दोन्ही पालक अथवा एक पालक मृत्यू झाला आहे व बालकांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील 2 मुलांना बाल सेवा योजनेत दरमहा 4 हजार रुपये मिळणार आहेत व त्याचे फॉर्म तहसील कार्यालयात उपलब्ध आहेत. अर्ज भरून जिल्हा बाल संरक्षण कक्ष, ज...