सिंधुदुर्ग today
नांदगाव ओटव फाटा ब्रिज वरील पथ दिवे डिसेंबर च्या अपघातानंतर बंदच.
१५ ऑगस्ट पर्यंत सुरळीत न केल्यास स्वातंत्र्यदिनी करणार आंदोलन ;ग्रामस्थांचा इशारा
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुक्यातील नांदगाव मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव ओटव फाटा ब्रिज खाली जवळपास २० ते २५ गावाचे प्राथमिक आरोग्य केंद्र असून ही या ब्रिज जवळील भागात स्ट्रीट लाईट डिसेंबर च्या अपघातानंतर बंदच असल्याने १५ ऑगस्ट पर्यंत सुरळीत न केल्यास १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनीच आंदोलन करण्याचा इशारा नांदगाव येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
या भागात हायवे प्राधिकरण व केसीसी कंपनी दुर्लक्ष करताना दिसत आहेत. येथे पथ दिवे सुरुवातीला लावण्यात आले होते. दरम्यान डिसेंबर २०२४ मध्ये शाळेतील सहल बस चा अपघात नांदगाव ओटव फाटा ब्रिज वर होत एस टी कठड्याला आदळून स्ट्रीट लाईट बंद पडल्या होत्या. त्यापासून संबंधित विभागाला वारंवार याबाबत सूचना करूनही त्याची दखल अद्यापही घेतलेली नाही यामुळे भागात यामुळे पूर्णतः अंधार पसरलेला आहे. अंधाराचा फायदा घेत या ब्रिजवर काही गैर कृत्य घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण या ब्रिज जवळील भागात पूर्णतः अंधकार पसरलेला आहे. तरी येणाऱ्या १५ ऑगस्ट पर्यंत संबंधित विभागाने सदर स्ट्रीटलाईट सुरळीत न केल्यास १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनीच या ब्रिज खाली ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी केला आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा