सिंधुदुर्ग today



नांदगाव रेल्वे स्टेशन समस्यांबाबत संघर्ष समितीने घेतली अधिकाऱ्यांची भेट.

विविध समस्यांचा वाचला पाढा.

नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)

कणकवली तालुक्यातील नांदगाव रेल्वे स्टेशन म्हणजे काय कणकवली तालुक्यातील महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे या रेल्वे टेशन मध्ये देवगड तालुक्यापासून ते फोंडा नांदगाव दशक्रोशीतील तसेच कासार्डे प्रवासी या ठिकाणी येत असतात अशावेळी या रेल्वे स्टेशन मध्ये होत असलेल्या समस्या बाबत आज येथील संघर्ष समिती यांनी नांदगाव व कणकवली या ठिकाणी आलेल्या रेल्वे अधिकारी यांची भेट घेतली. यामध्ये रेल्वे स्टेशन इमारत गळती, रंगरंगोटी प्लॅटफॉर्मवर निवारा शेड ,गणेश चतुर्थी पूर्वी मांडवी एक्स्प्रेस थांबा, रेल्वे कॅन्टीन,CCTV कॅमेरा बसविणे, रेल्वे स्थानक दिशादर्शक फलक लावण्यात यावे अशा विविध समस्यांचा पाढा वाचण्यात आला. लवकरच समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न होतील अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.

     यावेळी विजय सामंत,मधुकर मातोंडकर ,जी. पी .प्रकाश,  स्टेशन मास्तर कांबळे, आदी अधिकारी वर्ग उपस्थित होते.

    पियाळी उपसरपंच संजय ढवण, संघर्ष समिती अध्यक्ष वाघेरी माजी सरपंच संतोष राणे, नांदगाव सरपंच भाई मोरजकर,बाबू घाडीगांवकर, प्रदीप हरमलकर, तसेच या नांदगाव रेल्वे स्टेशन रिक्षा संघटना पदाधिकारी आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today