सिंधुदुर्ग today


रोजगार मेळाव्याचे पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य.

कणकवली : प्रतिनिधी  

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आणि कणकवली महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंदाचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे, जिल्हा कौशल्य विभागाचे आमिण तडवी, जिल्हा व्यवसाय शिक्षण विभागाचे अनिल मोहरे, शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, प्राचार्य युवराज महालिंगे, प्रा. हरिभाऊ भिसे, कणकवली ज्यु. कॉलेजचे पर्यवेक्षक श्री. माने आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today