सिंधुदुर्ग today



यशस्वी करिअरसाठी  योग्य निर्णयक्षमता महत्त्वाची - सौ-वंदना नागरगोजे

कासार्डे माध्य- व उच्च माध्यमिक विद्यालयात व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रमात प्रतिपादन 

:विठ्ठल रखुमाई मंदिर समिती ओझरम तिर्थवाडीचा स्तुत्य उपक्रम

      तळेरे - प्रतिनिधी

     यशस्वी करिअरसाठी जिद्द,चिकाटी,अपार कष्ट करण्याची तयारी आणि योग्य निर्णयक्षमता महत्त्वाची भूमिका बजावतात असे प्रतिपादन व्यवसाय सायकॉलॉजिस्ट सौ.वंदना नागरगोजे यांनी कासार्डे माध्यमिक विद्यालयात आयोजित व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रमात केले.

    त्या विठ्ठल रूखमाई मंदिर समिती ओझरम- तीर्थवाडी यांच्यावतीने आयोजित "व्यवसाय मार्गदर्शन" कार्यक्रमात कासार्डे माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होत्या.

      याप्रसंगी व्यासपीठावर कासार्डे विकास मंडळ मुंबईचे स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे,प्राचार्या सौ.बी.बी. बिसुरे,श्री.नागरगोजे,पर्यवेक्षक एस.व्ही राणे,विठ्ठल रूखमाई मंदिर समिती ओझरम तिर्थवाडीचे उपाध्यक्ष अशोक राणे,बाबू राणे,जितेंद्र राणे,ओझरम जि.प.पुर्ण 

प्राथमिक शाळा नं.१ चे मुख्याध्यापक विनायक जाधव,दिपक राणे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

    याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने कार्याध्यक्ष संजय पाताडे,प्राचार्यासौ.बी.बी.बिसुरे,सौ.वंदना नागरगोजे,श्री.नागरगोजे,ओझरम.नं१ चेमुख्याध्यापक विनायक जाधव,प्रशालेचे पर्यवेक्षक एस.व्ही.राणे  आदी मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

    दरम्यान व्यवसाय सायकालॉजिस्ट श्रीम.नागरगोजे यांनी  प्रशालेतील विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्र,मेडिकल क्षेत्र,इंजिनिअरींग क्षेत्र वनविभाग क्षेत्र,पोलिस विभाग, न्याय क्षेत्र,

आर्किटेक्चर क्षेत्र,आय टी आय.विभाग, पायलट,हवाई सुंदरी, हवाईदल, नौदल व भुदल तीन सैन्य विभाग,बँकिंग क्षेत्र,क्लरिकल विभाग,फिल्म इंडस्ट्री,लेबर ऑफिसर,सोशल वर्कर,प्लंबिंग विभाग,ब्युटी पार्लर,

फुले - बुके तयार करणे कोर्स यांसारख्या अनेक करिअरच्या क्षेत्रावर सखोल मार्गदर्शन केले.JEE,NEET EXAM 

 UPSC - MPSC परीक्षांबाबत मार्गदर्शन विशेष मार्गदर्शन केले. 

नियमित वर्तमानपत्रांचे वाचन करा..

      कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी सामान्यज्ञान फार महत्त्वाचे असते.त्यासाठी विद्यार्थ्यांनी लहान वयापासून नियमित वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावावी निश्चितच सामान्यज्ञान उत्तम होण्यास मदत होते.असाही त्यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना सल्ला दिला.

,...............................................

      विद्यालयाच्या प्राचार्या सौ.बी.बी.बिसुरे यांनी कार्यक्रमाबद्दल विठ्ठल रखुमाई मंदिर समिती ओझरम तीर्थवाडीचे ऋण व्यक्त करत आभार मानले. तर कार्याध्यक्ष संजय पाताडे यांनी अशा मार्गदर्शनातून  विद्यार्थ्यांनी योग्य प्रेरणा घेऊन आतापासून योग्य क्षेत्र निश्चित करून मार्गक्रमण करण्याचे आवाहन केले.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबू राणे यांनी केले.तर आभार जितेंद्र राणे यांनी मानून मार्गदर्शन वर्गाची सांगता केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today