सिंधुदुर्ग today
श्रीदेव दत्त मंदिर ट्रस्ट तोंडवली कुडतरकर वाडी यांच्या वतीने गुरु पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात.
समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार.
कणकवली प्रतिनिधी
श्रीदेव दत्त मंदिर ट्रस्ट तोंडवली कुडतरकर वाडी यांच्या वतीने गुरु पौर्णिमेनिमित्त यावर्षी पासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामध्ये किर्तन, भजन, दोन्ही वेळ महाप्रसाद तसेच समाजात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार यावेळी करण्यात आला.यामध्ये शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आग्रे, मंगेश नाडकर्णी, तोंडवली बावशी सरपंच मनाली गुरव, ग्रामपंचायत अधिकारी एकनाथ चव्हाण, कवी अजय कांडर, पत्रकार ऋषिकेश मोरजकर, तोंडवली बावशी तलाठी ,तोंडवली पोलीस पाटील विजय मोरये, पावणादेवी ट्रस्ट अध्यक्ष मुंबई समिती अतुल सदडेकर, माजी उपसरपंच अशोक बोभाटे , तोंडवली शाळा नंबर 1 मुख्याध्यापक जाधव आदींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष दिनकर कुडतरकर ,उपाध्यक्ष - प्रकाश नारकर, सचिव - प्रकाश कुडतरकर,सह सचिव - प्रल्हाद कुडतरकर, खजिनदार - दत्तप्रसाद कुडतरकर,सह खजिनदार - स्वप्नील कुडतरकर, सदस्य - उमेश कुडतरकर , संजय नारकर, सुरेश नर मंडळाचे इतर कार्यकर्ते रमेश कुडतरकर, श्रीकृष्ण कुडतरकर, अरुण नारकर, काशीनाथ कुडतरकर, महेश कुडतरकर, दिनेश कुडतरकर, राकेश कुडतरकर,रोहन कुडतरकर,यश कुडतरकर, कुणाल कुडतरकर,महिला कार्यकर्त्या श्रीम. अंकिता कुडतरकर, नम्रता कुडतरकर, दिक्षा कुडतरकर, प्रेमा कुडतरकर, जयश्री कुडतरकर, प्रज्ञा नारकर, आशा नारकर, वेदिका कुडतरकर, दिपाली कुडतरकर, रेश्मा कुडतरकर आदी सहभागी झाले होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा