सिंधुदुर्ग today
नांदगाव सावडाव केंद्रबलाचे केंद्रप्रमुख सद्गुरु कुबल यांचा सेवानिवृत्ती सोहळा संपन्न.
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुक्यातील नांदगाव व सावडाव केंद्रबल गटातील केंद्रप्रमुख सद्गुरु कुबल हे सेवानिवृत्त होत असल्याने आज असलदे येथील गौरी मंगल कार्यालय येथे कुटुंबीयांमार्फत सेवानिवृत्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या सोहळ्यासाठी बहुसंख्येने सद्गुरू कुबल प्रेमी उपस्थित होते. यात सामाजिक राजकीय शैक्षणिक सर्व क्षेत्रातील मंडळी आवर्जून सहभागी झाली होती. काहींनी सेवानिवृत्तीनंतर कुबल सरांनी राजकारणात यावे असा संदेश दिला तर काहींनी राजकारण सोडून इतर कोणताही सामाजिक, शैक्षणिक, व्यवसायिक मार्ग निवडावा असे मत व्यक्त केले.
या भरगच्च कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी सभापती तुळशिदास रावराणे, दिलिप तळेकर, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती नागेश मोरये, बाळा जठार, नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर, पंचायत समिती माजी सदस्या सौ हर्षदा वाळके, साळीस्ते माजी सरपंच चंद्रकांत हर्याण, हेमंत परुळेकर, सेवानिवृत्त केंद्र प्रमुख संतोष जाधव, वारगाव हायस्कूल मुख्याध्यापक हनुमंत वाळके, केंद्र शाळा नांदगाव शाळेचे केंद्र मुख्याध्यापक सुहास सावंत, नितीन जठार, निवृत्त केंद्रप्रमुख सुरेश हरकुळकर, दत्तात्रय कुबल, श्वेतल परब ,सावडाव हायस्कूल मुख्याध्यापक रविंद्र सावंत, लक्ष्मण वळवी, निवृत्त पी.एस.आय. प्रमोद डगरे, शिक्षक संघाचे सत्यवान केसरकर तसेच शिक्षक वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम ,प्रास्ताविक संतोष देसाई तर श्वेतल परब यांनी आभार मानले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा