सिंधुदुर्ग today



नांदगाव येथे होणार उद्या कला महोत्सव ; किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट चे आयोजन 

सहभाग घेणाऱ्या सर्व कलाकारांना मिळणार प्रमाणपत्र.

भजनी बुवा, मूर्तिकार , नाट्य कलाकार यांना सहभागी होता येणार.

कणकवली प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील किशोर मोरजकर  चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने नांदगाव दशक्रोशी मर्यादित कला महोत्सव चे आयोजन उद्या सोमवार दिनांक 28 जुलै 2025 रोजी दुपारी 3 ते 6 या वेळेत कला महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.  यासाठी या कला महोत्सव मध्ये सर्वप्रथम भजनी बुवा कलाकार मूर्तिकार नाट्य कलाकार यांनी आपली नाव नोंदणी करावी जे कलाकार यात सहभागी होऊन आपली कला सादर करतील या सर्व कलाकारांना प्रमाणपत्र संस्थेच्या वतीने देण्यात येणार आहे. तरी नांदगाव असलदे , कोळोशी , आयनल,तोंडवली - बावशी, ओटव, माईन,सावडाव,बेळणे आदी गावातील सर्व कलाकार आणि यात सहभागी होऊ शकणार आहेत. तरी इच्छुक भजनी बुवा, मूर्तिकार, नाट्य कलाकार यांनी सहभागी व्हावे असे आवाहन आवाहन किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today