सिंधुदुर्ग today
वेंगुर्ले येथील स्थानिक उबाठा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आंदोलनाकडे फिरवली पाठ.
माजी आम. परशुराम उपरकर यांनी ही आंदोलनात सहभागी होण्याचे टाळले.
उबाठा मधील दोन गट वेंगुर्ले येथे दिसून आले स्पष्ट.
वेंगुर्ले : प्रतिनिधी
उबाठा सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी आज दाभोली येथील प्रकारणावरून वेंगुर्ले येथे जाहीर केलेल्या आंदोलनाचा फज्जा उडाला. स्थानिक उबाठा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरविल्याने आम. नाईक यांना अधिकाऱ्यांशी चर्चा करून मागे फिरावे लागले. त्यांच्या सोबत असणारे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी ही या आंदोलनात सहभागी होण्याचे टाळले. तर दुसऱ्या बाजूला उबाठा सेने तर्फे शहरात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला कार्यक्रम दणक्यात केला. त्यामुळे उबाठा मधील दोन गट एक पुन्हा एकदा स्पष्ट दिसून आले.
दाभोली येथील जमीन विक्री प्रकरणावरून स्थानिक जमीन मालकांबरोबर आपण आहोत असे उबाठा सेनेचे माजी आमदार वैभव नाईक आणि माजी आम. परशुराम उपरकर यांनी जाहीर केले होते. काही दिवसांपूर्वी वेंगुर्ले पोलिस ठाण्यात येऊन संबंधितांवर कारवाई करावी अशी दोघांनी मागणी केली होती. त्यावेळी ही फारसे स्थानिक पदाधिकारी उपस्थित नव्हते. त्यानंतर त्यांनी २१ जुलै रोजी रजिस्टर कार्यालय समोर आंदोलनाचा इशारा दिला होता.
दरम्यान उबाठा चे जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी आणि मतदार संघ प्रमुख रुपेश राऊळ यांनी वेंगुर्ले येथे येऊन पत्रकार परिषदेतून मतदार संघ बाहेरच्या पदाधिकारी यांनी मनमानी करून या मतदार संघात ढवळा ढवळ करू नये असा इशारा दिला होता.
दरम्यान उबाठा सेने तर्फे वेंगुर्ले येथे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित केलेला न. प. स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम सर्वांनी मिळून केला. यावेळी बाबुराव धुरी, रूपेश राऊळ, तालुकाप्रमुख यशवंत परब व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
.jpg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा