सिंधुदुर्ग today



कुणकेश्वर शिवतीर्थावर पुन्हा मिळाला दैवी संकेत !

नागपंचमीला कुणकेश्वर येथे नागराज तर दुसऱ्याच दिवशी भैरव मंदिरात नागीणीचे दर्शन.

कुणकेश्वर (ऋषिकेश मोरजकर)

काल नागपंचमीच्या दिवशी नागराजांनी कुणकेश्वर येथे दर्शन दिल्यानंतर अवघ्या एका दिवसात पुन्हा एकदा सर्पदर्शनाची घटना घडली आहे. आज दुपारी सुमारे तीनच्या सुमारास कुणकेश्वर येथील भैरव मंदिराच्या सभा मंडपात नागिण आढळून आली.

सदर घटना लक्षात येताच देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी तत्काळ प्रतिसाद देत स्थानिक सर्पमित्र पराडकर यांना संपर्क केला. पराडकर यांनी घटनास्थळी येत श्री देव भैरवाला तुझ्या स्थळात असलेली ही नागीण मी कोणतीही दुखापत न करता पकडून नैसर्गिक अधिवासात सोडणार आहे. असे साकडे घातले त्यानंतर ती नागीण सुरक्षितपणे पकडली व तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

विशेष म्हणजे सध्या भैरव मंदिराचा जिर्णोद्धार सुरू आहे, आणि याच कालावधीत अशी दुर्मिळ सर्पदर्शनाची घटना घडल्याने भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणावर कुतूहल आणि धार्मिक भावनांना उधाण आले आहे. नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या दिवशी अशी घटना घडल्याने ही एक दैवी संकेत म्हणून भाविकांकडून पाहिली जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today