सिंधुदुर्ग today
कणकवली शहरात पोलिसांची अचानक नाकाबंदी.
नाका बंदी मुळे अनेकांची उडाली तारांबळ.
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुक्यासह शहरांमध्ये होणाऱ्या घरफोड्या, अवैध प्रवासी वाहतूक ,अवैद्य होणारी गोवाबनावटीची दारू वाहतूक अशा घटनांना आळा घालण्यासाठी कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली गांगो मंदिर येथे पोलिसांनी शनिवारी सायंकाळी सात वाजता नाकाबंदी केली केलेली पाहायला मिळाली. यावेळी पीएसआय नानचे, पोलीस हवालदार विनोद चव्हाण, महिला पोलीस विनया सावंत, पोलीस नाईक सुशांत जाधव , उपस्थित होते यावेळी चारचाकी व अवजड वाहनांची कसून तपासणी करण्यात आल्याचे पाहायला मिळाले पण या नाकामध्ये काही विना लायसनधारक व गाडीच्या कागदपत्रे नसणाऱ्या वाहनचालकांची तारांबळ उडाली पाहायला मिळाली


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा