सिंधुदुर्ग today
कवी सफरअली इसफ आणि मधुकर मातोंडकर यांना मास्तरांची सावली पुरस्कार प्रदान मुंबई रवींद्र नाट्यमंदिरात ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांच्या हस्ते सफरअली आणि मातोंडकर यांचा गौरव कणकवली/प्रतिनिधी मुंबई पु. ल.देशपांडे अकादमी रवींद्र नाट्य मंदिर येथे स्वामीराज प्रकाशन मुंबई आणि प्रभा प्रकाशन कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सुर्वे मास्तरांच्या साहित्य संमेलनात सिंधुदुर्गातील प्रसिद्ध कवी सफरअली इसफ यांना त्यांच्या अल्लाह ईश्वर काव्यसंग्रहासाठी आणि सांस्कृतिक कार्यकर्ते मधुकर मातोंडकर यांना त्यांच्या सांस्कृतिक योगदानासाठी ' मास्तरांची सावली ' काव्य पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घघाटन झालेल्या आणि राज्याचे भाषा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत समारोप झालेल्या सदर संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार सफरअली इसफ आणि मधुकर मातोंडकर यांना प्रदान करण्यात आला.यावेळी संमेलनाचे आयोजक ज्येष्ठ पत्रकार रजनीश राणे, सुप्रसिद्ध कवी तथा स्तंभ लेखक अजय कांडर, मा...