सिंधुदुर्ग today
तोंडवली,विद्यानगरी येथे फार्मसी क्षेत्रातील राज्यस्तरीय परिषद व पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न.
कणकवली प्रतिनिधी
सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटी संचलित श्री सरस्वती इंस्टीट्युट ऑफ फार्मसी, तोंडवली ता.कणकवली येथे शनिवार दि.२९ मार्च २०२५ रोजी फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थी, शिक्षक आणि संशोधक यांच्या साठी राज्यस्तरीय परिषद व पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा आयोजित करण्यात आली. बारामतीचे प्रा.डॉ. अजय शिंदे, टी.सी.एस. पुणेचे धीरज सराटे, औषध कंपनी सिग्मा लॅबोरेटरी गोव्याचे श्री.अभिजित नाईक यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमासाठी विविध फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुनील शिंगाडे, डॉ.युवराज पांढरे, डॉ. राजेश जगताप यांची अध्यक्ष म्हणून विशेष उपस्थिती लाभली. मोठ्या संख्येने राज्यभरातून २८ विविध फार्मसी महाविद्यालयातून चारशेहून अधिक विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते तसेच ७८ हून अधिक स्पर्धकांनी शोध आधारित पोस्टर सादरीकरण केले. या स्पर्धेमध्ये प्रथम क्र. सत्यजित विभूते आदर्श कॉलेज विटा , द्वितीय क्र. अंचिता शिंदे यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेज व उत्तेजनार्थ वाहीब काडविलकर, इफ्राह काझी, अभिषेक गोरीवले,प्रतीक्षा माने-पाटील आणि अनिकेत गायकवाड यांनी पारितोषिके पटकावली. या स्पर्धेचे परीक्षण डॉ. मेधा खाडे, डॉ. विपुल संसारे, डॉ. विनोद मुळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.श्वेता काणेकर यांनी केले. तसेच संस्था अध्यक्ष मा. श्री. वसंत सावंत व प्रशासकीय अधिकारी श्री. विनायक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थितांचे श्री सरस्वती इंस्टीट्युट ऑफ फार्मसी, तोंडवलीचे प्राचार्य डॉ. तुकाराम केदार यांनी आभार मानले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होत असलेल्या दर्जेदार शैक्षणिक कामाचे व प्रगतीचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा